प्रताप बडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क - कासेगाव: पुण्याहून सांगलीकडे चाललेल्या बसमधून एका महिलेची पर्स चोरणाऱ्या आंतरराज्य सहा महिलांच्या लूटमार टोळीला कासेगाव पोलिसांनी मोठ्या शितापीने जेरबंद केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवार दि. १७ रोजी पुणे हुन सांगली कडे निघाली होती. या बस मधून सुनीता तात्यासाहेब पाटील रा.कवठेमहांकाळ या ही प्रवास करीत होत्या.सदर बस नेर्ले ता.वाळवा येथील बस थांब्यावर आली असता पाटील यांना त्यांच्या जवळची पर्स गायब असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी आरडाओरड केली. यावेळी त्या बस मधील काही महिला लहान मुलासह घाईगडबडीने बाहेर पडल्या.
ही बस व प्रवासी कासेगाव पोलिस ठाण्यात आले.त्यांनी रीतसर तक्रार केली.पोलिस निरीक्षक अविनाश मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पोलिसांनी सूत्रे हलवली.यावेळी सदर सांशीयत महिला या प्रवासी वाहतुकीने कराड जि. सातारा या दिशेने निघाल्याचे समजले तात्काळ कासेगाव पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करीत त्या महिलांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याचा नेकलेस,लक्ष्मीहार,सोन्याचे गांठण,रोख पाच हजार असा एकूण १ लाख ४४ हजार ३४५ रुपयांचा ऐवज जप्त केला.यामधील सांशीयत अलबेली शिवा बुडबुड वय (२०),नर्सवा अशोक उर्फ राजू बुडबुड वय (३५),सरस्वती वसंत बुडबुड वय(२१),रायस्वारी सचिन बुडबुड वय (२०),ज्योती सुरेश बुडबुड वय (२५),अंजली प्रदीप बुडबुड वय (२५) सर्व रा.औरंगाबाद चिखलठाणा जालना रोड यांना कासेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.