नवी दिल्ली : हॉटेल ताज पॅलेसमध्ये 12 सप्टेंबर 2017 ला फिल्म तेरा इंतजारचे प्रमोशन आयोजित करण्यात आले होते. या चित्रपटाची नायिका सनी लिओनी होती. तर नायक अरबाज खान होता. या कार्य़क्रमाला जवळपास 1000 लोक जमले होते, जे तेथील झगमगाट पाहून हवेतच उडाले होते. ब्लू फॉक्स मोशन पिक्चर्स (प्राइवेट) लिमिटेड प्रॉडक्शन हाऊस ने याचवेळी लोकांना मोठी ऑफर देऊ केली. सनी लिओनीला पाहण्यासाठी आलेल्यांसह हजारो जणांनी ती ऑफर स्वीकारली आणि कोट्यवधी रुपये गमावून बसले.
ब्लू फॉक्सने या लोकांना चित्रपट सृष्टीमध्ये पैसे गुंतवण्याची ऑफर दिली. याद्वारे 2 लाख गुंतवल्यास वर्षभरात 5 लाख रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले. आधीच सनीच्या धुंदीत असलेल्या या तरुणांनी या ऑफरला पाहून जवळपास होते नव्हते तेवढे पैसे दिले. मात्र, त्यांना पुन्हा ते पैसे काही मिळाले नाहीत. या कंपनीमध्ये जवळपास 14 हजार लोकांनी पैसे गुंतविल्याचे समोर येत आहे.
यामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली. आधी प्रकरण छोटे असल्याचे पोलिसांना वाटले, मात्र चौकशीवेळी या फसवणुकीच्या प्रकारामध्ये दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील लोक अडकल्याचे समोर आले. एकट्या मोहालीमधूनच 200 लोकांनी या स्कीममध्ये 190 कोटी रुपये गमावल्याचे उघड झाले.
सुरक्षित प्रवासासाठी तरुणीने उबर बूक केली; तिच्या समोरच चालकाचे किळसवाणे कृत्य
मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'लकी' गर्ल दीप्ती सती ड्रेसमध्ये दिसली So Cute!
मतदार यादीला आधार लिंक, कायदा मंत्रालयाकडून अंतिम स्वरुप?
धक्कादायक म्हणजे कंपनीच्या प्रमोशनसाठी अभिनेता सोहेल खानही येत होता. कंपनीने नंतर काही गुंतवणूक स्कीम सांगितल्या होत्या. दिल्लीच्या बाराखंभा रोडवर कंपनीचे ऑफिस होते. चार डायरेक्टर होते. ईओडब्ल्यूने केलेल्या चौकशीमध्ये चारही संचालकांना नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र कोणीही चौकशीसाठी आले नाही. धर्मवीर आणि विजेंद्र सिंह या दोन एजंटनी सांगितले की त्यांचेच 30 लाख रुपये बुडाले आहेत.