नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हे आदेश राउज एवेन्यू कोर्टाने दिले असून चिदंबरम यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्लीतीळ राउज एवेन्यू कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. मागील सुनावणीदरम्यान देखील कोर्टाने आयएनएक्स मीडिया प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना १४ दिवसांसाठी १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीय कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्ली न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आज ही संपली असून चिदंबरम यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं. मागील सुनावणीदरम्यान आणखी एका दिवसाच्या चौकशीसाठी त्यांची आणखी एक दिवसाची कोठडी देण्याची ईडीने केलेली मागणी दिल्ली न्यायालयाने फेटाळून लावली होती. दरम्यान तिहारच्या तुरुंगात पी. चिदंबरम यांना सुविधा पुरवण्याचा आदेश न्यायालयाने दिले होते.
INX Media Case : पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 6:13 PM
INX Media Case : चिदंबरम यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्लीतीळ राउज एवेन्यू कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं.
ठळक मुद्देमाजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तिहारच्या तुरुंगात पी. चिदंबरम यांना सुविधा पुरवण्याचा आदेश न्यायालयाने दिले होते.