नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणी शुक्रवारी न्यायालयाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली होती.सीबीआयने न्यायालयाकडे ५ दिवसांची कोठडी मागितली होती. त्यानंतर चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टाला सोमवारपर्यंत कोठडीत राहण्याची विनंती केली होती. आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी अंतरिम जामीन मिळावा यासाठी पी. चिदंबरम यांच्या विनंतीची दखल घेऊन त्यावर निर्णय द्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाला दिले आहे. कनिष्ठ न्यायालयाने जर चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला तर त्यांना तिहार तुरुंगात पाठवू नये. त्याऐवजी त्यांना घरीच स्थानबद्ध करावे, असे आदेश देत सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना तूर्त दिलासा दिलासा आहे.
सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे की चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाणार नाही. जर ट्रायल कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला तर ते ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीतच राहतील. सुनावणीदरम्यान चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात चिदंबरम हे ७४ वर्षांचे आहेत आणि त्यांना घरी स्थानबद्ध केलं जाऊ शकतं. यामुळे कोणाला काही समस्या नसावी असा युक्तिवाद केला.