INX MEDIA CASE : पी.चिदंबरम यांच्यासह त्यांच्या मुलाच्या विरोधातील CBIच्या याचिकेवर उद्या सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 09:47 PM2021-08-08T21:47:54+5:302021-08-08T21:48:51+5:30
INX MEDIA CASE : सीबीआयने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली आहे.
आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि देशाचे माजी वित्तमंत्री पी.चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या विरोधातील सीबीआयच्या याचिकेवर उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सीबीआयने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली आहे.
दिल्ली हायकोर्टाने १८ मे रोजी पी चिदंबरम यांच्या खटल्याच्या सुनावणीला १८ मे रोजी स्थगिती दिली होती. चिदंबरम, कार्ती आणि इतरांना नोटिसा पाठवून सीबीआयच्या याचिकेवर उत्तर मागितले होते.
चिदंबरम यांना सीबीआयने आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी २१ ऑगस्ट २०१९ रोजी अटक झाली होती, त्याच वर्षी १६ ऑक्टोबरला त्यांना ईडीने काळ्या पैशाच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर सहा दिवसांनी २२ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला होता. सुप्रीम कोर्टाकडून हा सशर्त जामीन मंजूर केला होता. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं अन् देश सोडून जाऊ नये या अटीवर त्यांना जामीन मंजूर झाला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे पी. चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला होता. पी. चिदंबरम १७ ऑक्टोबरपासून ईडी कोठडीत होते. १०६ दिवसांपासून चिदंबरम तिहारमधील तुरुंगात होते.