नवी दिल्ली - आयएनएक्स मीडियावर घोटाळ्याप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवर दिल्ली हायकोर्टाने उद्यापर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे उद्या पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. पी. चिदंबरम यांची बाजू ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडली. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून ओळखले जाणारे आणि सामान्य जनतेच्या स्वप्नातील अर्थसंकल्प सादर करण्यासाठी लोकप्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कधी कल्पना सुद्धा केली नसेल की त्यांना तिहार तुरुंगात राहावे लागेल. मात्र, ते न्यायालयीन कोठडीचे दिवस तिहार तुरुंगात मोजत आहेत.
आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवर स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 9:29 PM
ते न्यायालयीन कोठडीचे दिवस तिहार तुरुंगात मोजत आहेत.
ठळक मुद्देपी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पी. चिदंबरम यांची बाजू ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडली.