नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून ओळखले जाणारे आणि सामान्य जनतेच्या स्वप्नातील अर्थसंकल्प सादर करण्यासाठी लोकप्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कधी कल्पना सुद्धा केली नसेल की त्यांना तिहार तुरुंगात राहावे लागेल. मात्र, ते न्यायालयीन कोठडीचे दिवस तिहार तुरुंगात मोजत आहेत. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी पी. चिदंबरम यांची सीबीआय न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर आज विशेष न्यायालयाने पुन्हा चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पी. चिदंबरम यांना तिहार तुरुंगात वेस्टर्न टॉयलेट, टीव्ही, पुस्तकं, चष्मा आणि औषधेही देण्यात आली आहेत. पी. चिदंबरम यांना या सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांना कोर्टात एक अर्ज दाखल केला होता. त्याला न्यायालयाने मंजुरी देत पी. चिदंबरम यांना तुरुंगात सुरक्षा पुवण्याचे आदेश दिले होते. पी. चिदंबरम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हापासून ते सीबीआयच्या ताब्यात होते. आज त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती असून त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली.
आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 5:54 PM
INX Media Scam: पी. चिदंबरम न्यायालयीन कोठडीचे दिवस तिहार तुरुंगात मोजत आहेत.
ठळक मुद्देआज त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती असून त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली.पुन्हा चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.