मुंबई - मृत गँगस्टर इकबाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची शुक्रवारी (दि.१८) चौकशी करण्यात येणार आहे. वरळीतील सीजे हाऊसमधील त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहारबााबत त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर परिसरातील ईडीच्या कार्यालयात त्यांना पाचारण करण्यात आले आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची धामधुम सुरु असल्याने पटेल यांच्या चौकशीमुळे त्यांचे राजकीय पडसाद उमटू नये, त्याबाबत पुरेशी दक्षात घेण्यात आली असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. मिर्चीच्या मालकीच्या सीजे हाऊसमधील दोन फ्लॅट पटेल यांनी विकत घेतली असल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. याप्रकरणात अटक केलेल्या या रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ या दलालाच्या चौकशीतून पुढे आली आहे. २००७ मध्ये त्याच्या विकास करार होवून हस्तांतर करण्यात आले. पटेल यांचे त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे.अंडर वर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या इकबाल मिर्चीचे फरार असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने १९८६ मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत घेतली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती.