ठळक मुद्देदोघांनाही न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात माजी पोलीस महासंचालक वंजारा आणि एन के अमीन यांनी २६ मार्च आपली आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज सीबीआय कोर्टात केला होता.
अहमदाबाद - इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी सीबीआय विशेष कोर्टाने निवृत्त पोलीस महासंचालक डी. जी. वंजारा, आणि एन के अमीन यांना दिलासा दिला आहे. दोघांनाही न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. याप्रकऱणी न्यायालयाने ३० एप्रिल रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.
इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात माजी पोलीस महासंचालक वंजारा आणि एन के अमीन यांनी २६ मार्च आपली आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज सीबीआय कोर्टात केला होता. त्यानतंर सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. के. पांडे यांनी तो अर्ज मंजूर केला. या प्रकरणी सीबीआयने माजी पोलीस महासंचालक पी. पी. पांडे, माजी महासंचालक डी. जी. वंजारा, जी. एल. सिंघल, एन. के. अमीन, तरुण बरोट यांच्यासह अन्य २ पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आले होते.