शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ISIचा कट शिजतोय! दहशतवादी बनवू शकतात मालगाड्यांना आपला निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 6:38 PM

ISI Plotting plan :आयएसआय भारताचे गंभीर नुकसान करण्याचा कट रचत आहे, असे या इशाऱ्यात म्हटले आहे.

चंदीगड : देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी पंजाब सरकारला खलिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवायांपासून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गुप्तचर संस्थांनी इशारा दिला आहे की, पाकिस्तानचे आयएसआय पंजाब आणि पंजाब लगतच्या राज्यांमधील रेल्वे ट्रॅकला निशाणा साधण्यासाठी खलिस्तानी ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGWs) किंवा स्लीपर सेलचा वापर करू शकतात. आयएसआय भारताचे गंभीर नुकसान करण्याचा कट रचत आहे, असे या इशाऱ्यात म्हटले आहे.सूत्रांच्या हवाल्याने एका मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, आयएसआय रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या मालगाड्यांना लक्ष्य करण्याचा विचार करत आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, आयएसआय लाहोरमध्ये लपलेला दहशतवादी हरविंदर सिंग रिंडासोबत खलिस्तानच्या स्लीपर सेल आणि ओजीडब्ल्यूला मोठा फ़ंड देऊ करत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार आणि रेल्वे संरक्षण दलांना पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील रेल्वे नेटवर्कवर पाळत ठेवण्यास सांगितले आहे. त्याच वेळी, राज्यांमधील भारतीय रेल्वेच्या विभागीय कार्यालयांना तत्काळ प्रभावाशालीपणे ट्रॅकवर गस्त वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शिख फॉर जस्टिसचीही नापाक भूमिका आहेसुरक्षा एजन्सींनी गोळा केलेले पुरावे हे सिद्ध करतात की, भारतविरोधी घटक (AIEs) पंजाबमधील शांतता आणि सौहार्द भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आयएसआयला यश मिळू शकले नाही, तेव्हा त्यांनी सीमावर्ती राज्यात दहशतवाद पुनर्संचयित करण्यासाठी पंजाबवर लक्ष केंद्रित केले. शिख फॉर जस्टिस (SFJ) बब्बर खालसा आदी शीख दहशतवादी संघटना या कामात गुंतल्या होत्या.खलिस्तानी नेटवर्कचा विस्तार!परदेशात बसलेले दहशतवादी पंजाबच्या दिशाभूल तरुणांना शस्त्रे हाती घेऊन राज्यात दहशतवादी घटना घडवून आणण्यासाठी मदत करत आहेत. गुप्तचर माहितीनुसार, हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातून चार शीख दहशतवाद्यांना नुकतीच झालेली अटक आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आल्याने असे सूचित होते की, खलिस्तानी दहशतवादी त्यांचे जाळे इतर राज्यांमध्येही विस्तारत आहेत.

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीISIआयएसआयPunjabपंजाबrailwayरेल्वे