मुंबई - १९९३ मुंबई बॉम्बस्फोटामधील मोस्ट वॉन्टेड आरोपी आणि कुख्यात गुंड दाऊदचा खास साथीदार अशी ओळख असलेल्या छोटा शकीलचा २०१६ साली एका वाढदिवसादरम्यान टिपलेले छायाचित्र तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे. १९८० च्या दशकात टिपलेले शकीलच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशी तुलना केली तर काळानुसार छोटा शकीलच्या चेहऱ्यात सुद्धा बराच फरक आढळून येतो आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा खास साथीदार छोटा शकीलचा १९९३ बॉम्बस्फोटात सहभाग असून तो शस्त्र पुरविण्याचे काम करी. तसेच बॉलिवूडमध्ये देखील शकील नाव चर्चेत होते. दाऊदचा पैसे बॉलिवूडमध्ये गुंतविण्याचे काम शकील करत होता. असं बोलला जातं छोटा शकीलला घाबरूनच छोटा राजन स्वतः पोलिसांच्या ताब्यात आला. कारण जेलमध्ये घुसून राजनला मारण्याची धमकी शकीलने दिली होती. टॉप मोस्ट वॉन्टेड यादीत छोटा शकीलचे नाव असून मुंबई पोलीस आणि सीबीआयला शकीलचा ताबा हवा आहे.
कोण आहे छोटा शकील
नाव - छोटा शकील
खरं नाव - शकील बाबूमियां शेख
आईचं नाव - शुब्रा बी
वडिलांचं नाव - मोइनुद्दीन शेख
मुलं - एक मुलगा, दोन मुली
जन्मस्थळ - मुंबई
उंची - जवळपास 5 फुट 6 इंच
गॅंग - डी कंपनी
सध्या राहण्याचे ठिकाण - डिफेंस एरिया, कराची, पाकिस्तान