शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

अबब! मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या नेत्यावर IT ची धाड; ७०-८० कोटी मिळाली देणगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 4:52 PM

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील चुनाभट्टी स्टेशनसमोरील जनतावादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयावर धाड टाकली.

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या सायन परिसरात असणाऱ्या झोपडपट्टीत राहणारे जनतावादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष कटके हे आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. झोपडपट्टीतून चालणाऱ्या या पक्षाला जवळपास ७०-८० कोटी देणगी मिळाल्याचं उघड झाले आहे. त्यामुळे बुधवारी झोपडपट्टीत राहणाऱ्या संतोष कटके यांच्या घरी आयकर विभागानं छापा टाकला. २०१४ मध्ये संतोष कटके यांनी पक्षाची स्थापना केली होती. २०१४ ते २०२२ या कालावधीत संतोष कटके यांच्या पक्षाला ७०-८० कोटी देणगी मिळाली आहे. 

आयकर विभागाला संशय होता की, संतोष कटके हा जनतवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करत होता. बुधवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संतोष कटकेच्या घरासोबत चुनाभट्टी येथील कार्यालयावरही छापा टाकला. यावेळी संतोषसह त्याच्या कुटुंबियांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. सकाळी ६ च्या सुमारास आयकर विभागाची टीम संतोषच्या सायन येथील घरी पोहचली होती. 

सायन येथील ट्रान्झिट कॅम्पमध्ये संतोष कटके गेल्या २० वर्षापासून राहत आहे. संतोषच्या चौकशीत अधिकाऱ्यांनी पक्षाशी संबंधित आयकराची कागदपत्रे, देणगीशी निगडीत व्यवहार, बिले मागितली. आतापर्यंत पक्षाने किती निवडणुका लढल्या. त्यावर किती खर्च झाला आणि खर्च केल्यानंतर किती पैसा उरला आहे. उरलेले पैसे कुठे आहेत असे विविध प्रश्न चौकशीत विचारण्यात आले. 

आयकर विभागाचा धाड हे षडयंत्र आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील चुनाभट्टी स्टेशनसमोरील जनतावादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयावर धाड टाकली. १० बाय १० फूटाचं हे कार्यालय संतोषनं भाड्याने घेतले आहे. मात्र आयकर विभागाच्या कारवाईवर आरोप करत हे षडयंत्र असल्याचा दावा संतोषनं पत्रकारांशी बोलताना केला. संतोष कटके म्हणाला की, माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जात आहे. मी निवडणूक आयोगाकडे माझ्या पक्षाशी निगडीत कागदपत्रे आणि पैशांचा हिशोब पाठवला. त्यानंतर काही महिन्यात माझ्या घरावर ही छापेमारी करण्यात आली. हे सगळं ठरवून केले आहे. आयकर विभागाला माझ्या घरी काहीच सापडलं नाही. माझी सगळी कागदपत्रे क्लिअर आहेत. त्यामुळे माझ्यावर पुढील कारवाई केली नाही असा दावा त्याने केला.  

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स