शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

20 वर्षांपासून फरार असलेल्या एका गँगस्टरला Google च्या मदतीने पाठवले तुरुंगात 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 11:08 AM

Italian mafia fugitive arrested in Spain : गुगल मॅप्स स्ट्रीट व्ह्यूचे फोटो शोधत असताना, पोलिसांना मोस्ट वाँटेड गँगस्टर (Most Wanted Gangster) एका दुकानाबाहेर उभा असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला अटक केली.

रोम : जवळपास 20 वर्षांपासून इटालियन पोलिसांच्या  (Italy Police) डोळ्यात धूळफेक करणारा एक गुन्हेगार गुगलमुळे  (Google) तुरुंगात पोहोचला आहे. दरम्यान, गुगल मॅप्स स्ट्रीट व्ह्यूचे फोटो शोधत असताना, पोलिसांना मोस्ट वाँटेड गँगस्टर (Most Wanted Gangster) एका दुकानाबाहेर उभा असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला अटक केली.

'डेली स्टार यूके'च्या रिपोर्टनुसार, गुन्हेगार Gioacchino Gammino याला हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते, परंतु तो 2002 मध्ये रोममधील तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अलीकडे, गुगल स्ट्रीट व्ह्यूचे (Google Street View) फोटो पाहत असताना, पोलिसांनी Gioacchino Gammino एका दुकानाबाहेर उभा असल्याचे पाहिले. Gioacchino Gammino हा नव्या नावाने स्पेनमध्ये नवीन आयुष्य जगत होता. तसेच, त्याने स्पेनमध्येही एक दुकान उघडले होते.

गुन्हेगार Gioacchino Gammino ने आपले नाव बदलून Manuel असे ठेवले होते आणि किराणा दुकान चालवण्यास सुरुवात केली. याशिवाय, त्याने एका रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणूनही काम केले. Gioacchino Gammino जेव्हा त्याच्या दुकानाबाहेर कोणाशी बोलत होता तेव्हा त्याचा चेहरा गुगल स्ट्रीट व्ह्यू फोटोमध्ये कैद झाला होता आणि त्याआधारे पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले. Gioacchino Gammino ला पुन्हा कारागृहात आणण्यात आले असून आता तो जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करणार आहे.

जखमेच्या खुणेवरून ओळख पटली पोलिसांनी सांगितले की, जेव्हा गुगल स्ट्रीट व्ह्यूमध्ये मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराचा फोटो दिसला. त्यावेळी त्याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. कारण, ज्याचा गेल्या 20 वर्षांपासून शोध घेतला जात होतो, हा तोच आहे का, स्पष्ट करण्यासाठी. यादरम्यान गुन्हेगाराच्या हनुवटीवर जखमेची खूण दिसली, त्यामुळे त्याची ओळख पटली. 17 डिसेंबरला, जेव्हा पोलीस गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले. अखेर त्याचा नवा ठावठिकाणा पोलिसांना कसा कळला ते समजले नाही. त्याने पोलिसांना विचारले, 'माझा ठिवठिकाणा कसा लागला? मी 10 वर्षांपासून माझ्या घरच्यांशीही बोललो नाही'.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoogleगुगलItalyइटली