Sicilian Mafia : इटलीतील मोस्ट वॉन्टेड व्यक्ती आणि सिसिलीमधील कोसा नोस्ट्रा माफियांचा एक प्रमुख मॅटेओ मेसिना डेनारो याला पोलिसांनी अटक केली आहे. मॅटेओ मेसिना डेनारोला पालेर्मो येथील खाजगी आरोग्य क्लिनिकमध्ये उपचार घेत असताना अटक करण्यात आली, असे वकील मॉरिझियो डी लुसिया यांनी सोमवारी सांगितले.
सीएनएनच्या वृत्तानुसार, मॅटेओ मेसिना डेनारो 1993 पासून फरार होता आणि युरोपोलने त्याला युरोपमधील मोस्ट वॉन्टेड लोकांपैकी एक मानले होते. त्याला अटक केल्यामुळे हा सर्व पोलिसांचा विजय आहे, असे मॉरिझियो डी लुसिया यांनी सांगितले. तर इटलीचे पोलिस प्रमुख लॅम्बर्टो गियानिनी यांनी कॅराबिनेरी (इटलीचे मिलिटरी पोलिस) आणि पालेर्मो सरकारी वकील कार्यालयाचे अभिनंदन करताना एका निवेदनात म्हटले आहे की, "हा सर्व पोलिस दलांचा विजय आहे, ज्यांनी या फरार झालेल्या व्यक्तीला अटक करण्यासाठी अनके वर्षांपासून एकत्र काम केले."
इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ट्विट केले की, "राज्यासाठी एक मोठा विजय आहे, जो माफियांसमोर हार मानत नाही हे दर्शवितो. हा असा दिवस आहे, जो आपण साजरा करू शकतो आणि आपल्या मुलांना सांगू शकतो की माफियांचा पराभव केला जाऊ शकतो". दरम्यान, मॅटेओ मेसिना डेनारोने अनेक माफिया-संबंधित हत्येचे आदेश दिले होते असे म्हटले जाते. तसेच, अनेक गुन्ह्यांसाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. विशेष म्हणजे 1992 मध्ये माफिया विरोधी वकील जियोव्हानी फाल्कोन आणि पाओलो बोर्सेलिनो यांच्या हत्येशी संबंधीत प्रकरणात त्याचा हात होता.
1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात मिलान, फ्लॉरेन्स आणि रोम येथे झालेल्या प्राणघातक बॉम्बस्फोटांसाठी आणि सिसिलियन कोसा नॉस्ट्राच्या विरोधात पुरावे देणाऱ्या शत्रूच्या 11 वर्षांच्या मुलाचा छळ आणि खून केल्याबद्दल मॅटेओ मेसिना डेनारोला अलीकडेच 2020 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. जवळपास 30 वर्षे मोस्ट वाँटेड असल्याने, तो कोसा नोट्राचा सर्वात जास्त काळ फरार असलेला व्यक्ती होता.
अशी केली अटक...स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 च्या सुमारास अँटी-माफिया काराबिनेरीसह 100 हून अधिक विशेष एजंट्सने पहाटेच्या वेळी छापा टाकल्यानंतर मेसिना डेनारोला ताब्यात घेण्यात आले. मॅडलेना क्लिनिक जिथे तिला अटक करण्यात आली होती, ते एक खाजगी क्लिनिक आहे जे प्लास्टिक सर्जरी आणि इतर वैकल्पिक शस्त्रक्रियांसाठी ओळखले जाते. मेसिना डेनारोवर कोणते उपचार केले जात होते हे माहित नाही.