मुंबई - जे. डे. हत्याकांडप्रकरणी निर्दोष सुटलेल्या पत्रकार जिग्ना व्होरा आणि स्थानिक नेता जॉन पॉल्सन जोसेफ यांच्या दोषमुक्तीला सीबीआयकडून हायकोर्टात आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे. पॉल्सनविरोधातील याचिकेवरील सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली असून जिग्नाविरोधात अपिलावर १८ मार्चला सुनावणी घेण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी कुख्यात गुंड छोटा राजनसह कोर्टाने सर्व ९ दोषींना जन्मठेप सुनावली असून पत्रकार जिग्ना आणि पॉल्सन जोसेफ यांना निर्दोष मुक्त केले होते. पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणात मोक्का कोर्टाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह ९ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्या प्रकरणातील आरोपी पत्रकार जिग्ना वोरा आणि पॉलसन जोसेफ यांना कोर्टाने दोषमुक्त केले होते.