प्रेमसंबंध लपवण्याच्या बदल्यात मुलाने मागितले होते १०० रूपये, अल्पवयीन मुलाने केली हत्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 10:39 AM2021-03-15T10:39:04+5:302021-03-15T10:42:45+5:30
पोलिसांनी मुलाच्या हत्येच्या आरोपात १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. प्रेमसंबंध लपण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाची हत्या केली.
मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील जुगपुरा परिसरातील १० वर्षीय मुलाचा मृतदेह नर्मदा नदीत आढळून आला. पोलिसांनी मुलाच्या हत्येच्या आरोपात १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. प्रेमसंबंध लपण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाची हत्या केली.
मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी अल्पवयीन मुलांचं मृत राजाच्या बहिणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. हे राजाला समजलं होतं. अशात तो आरोपीला बहिणीसोबतच्या त्याच्या प्रेमसंबंधाबाबत सांगेल अशी धमकी देत १००-२०० रूपये मागत होता. इतकेच नाही तर मृत राजा आरोपीचा मोबाइलही वापरत होता. (हे पण वाचा : विकृतीचा कळस, अल्पवयीनाला समोर उभा करून पत्नीशी ठेवायचा शारीरिक संबंध)
अशात पुन्हा पुन्हा पैसे आणि मोबाइल्या मागणीने आरोपी हैराण झाला होता. त्यामुळे त्याने राजाची हत्या केली. आरोपीने बांबूने राजाच्या डोक्यावर वार केले आणि त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह नदी फेकून दिला.
दरम्यान मृत राजा गेल्या ८ दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. ८ दिवसांआधी राजा शेजारी राहणाऱ्या काकांकडे आईला बोलवण्यासाठी घरातून निघाला होता. पण तेव्हापासून तो बेपत्ता होता. कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिल्यावर त्याचा शोध घेतला जात होता. (हे पण वाचा : बंद कॅमेऱ्याआड नर्सिंगच्या विद्यार्थिंनींसोबत अश्लील कृत्य; गुप्तांगाला स्पर्श करत केली सहनशक्ती टेस्ट )
बराच शोध घेतल्यानंतर राजाबाबत काहीच समजलं नाही. अशात पोलिसांना हत्येचा संशय आला. तेव्हा पोलिसांनी आजूबाजूच्या नदी-नाल्यात त्याचा शोध घेणं सुरू केलं. दरम्यान पोलीस योग्य तपास करत असल्यावरून स्थानिक आमदारही संतापले होते.