Jabalpur Railway Station: पोलिसाचे अमानवीय कृत्य; वृद्धाला लाथांनी बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 08:55 PM2022-07-29T20:55:44+5:302022-07-29T20:57:55+5:30

Jabalpur Railway Station: पोलीस हे सामान्यांच्या रक्षणासाठी असतात, पण हा रक्षक भक्षक बनत असेल तर...

Jabalpur Railway Station: Inhuman Act of Police; old man was brutally beaten with kicks, the video went viral... | Jabalpur Railway Station: पोलिसाचे अमानवीय कृत्य; वृद्धाला लाथांनी बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल...

Jabalpur Railway Station: पोलिसाचे अमानवीय कृत्य; वृद्धाला लाथांनी बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल...

Next

Jabalpur Video: पोलीस हे सामान्यांच्या रक्षणासाठी असतात. पण, कधी-कधी रक्षकचं भक्षक बनतो. पोलिसाच्या अमानवीय कृत्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. जबलपूर रेल्वे स्थानकाचा हा व्हिडिओ असून, यात एक पोलीस कर्मचारी वृद्धाला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. झी-टीव्हीने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पोलिसाची वृद्धाला बेदम मारहाण 
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जबलपूरमध्ये पोलीस कर्मचारी एका वृद्धाला बेदम मारहाण करतोय. व्हिडिओमध्ये एक पोलीस वृद्धाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर ओढून तोंडावर आणि पोटात जोराने लाथ मारताना दिसत आहे. यानंतर पोलीस त्या व्यक्तीला रेल्वे ट्रॅकवर नेतो आणि उलटं लटकवून लाथांनी मारहाण करतो.

लोकांमध्ये संताप
हा व्हिडिओ दुसऱ्या ट्रेनमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील जबलपूर रेल्वे स्टेशनचा आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक सातत्याने पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. पोलिस कर्मचाऱ्याबद्दल लोकांमध्ये नाराजी असून प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Web Title: Jabalpur Railway Station: Inhuman Act of Police; old man was brutally beaten with kicks, the video went viral...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.