मनी लॉन्ड्रिंग केसमधून (money laundering case) अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) इतक्यात तरी सुटणार नाही असं दिसतंय. जॅकलीनने IIFA अवॉर्ड्स शोसाठी तिला परदेशात जाता येणार नाहीये. ED ने जॅकलीनची परदेशात जाऊ देण्याची मागणी फेटाळली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणी जॅकलीन कोर्टात गेली होती आणि तिने परदेशात जाऊ देण्याची मागणी केली होती. आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे.
जॅकलीनने कोर्टात परदेशात जाऊ देण्याबाबत दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. ED ला व्हेरिफिकेशन दरम्यान जॅकलीनचं परदेशात जाऊ देण्याचं कारण बरोबर आढळलं नाही. जॅकलीनने दावा केला होता की, तिला नेपाळला दबंग टूरसाठी जायचं आहे. पण एजन्सीने जॅकलीनचा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. ED ने खुलासा केला की, जॅकलीन तर दबंग टूरचा भागच नाहीये. मग काय जॅकलीनचं हे खोटं समोर आल्यावर जॅकलीनला तिने कोर्टात सादर केलेला अर्ज मागे घ्यावा लागला.
परदेशात जाऊ देण्याच्या मागणीचा अर्ज जॅकलीनने दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टात सादर केला होता. ईडीने महाठग सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग केसमधून अजून क्लीनचीट दिलेली नाही. त्यामुळे तिच्या परदेश दौऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ईडीने याप्रकरणी जॅकलीनची चौकशी केली आहे. कारण सुकेशने लुटलेल्या पैशातून जॅकलीन आणि तिच्या कुटुंबियांसाठी महागडे गिफ्ट घेतले होते.
जॅकलीनने कोर्टात कामानिमित्त परदेशात जाऊ देण्याची मागणी केली होती. जॅकलीनने १५ दिवसांची परवानगी मागितली होती. तिच्यानुसार, ती २०-२१ मे ला अबूधाबीमध्ये होणाऱ्या आयफा अवॉर्डमध्ये सहभागी होणार आहे. अबूधाबीसोबतच ती फ्रान्स, नेपाळलाही जाणार आहे. जॅकलीन कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही जाणार होती. सोबच नेपाळमध्ये दबंग टूरमध्ये सहभागी होणार होती.