शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अमरावतीत ‘जेलब्रेक’; कारागृहाची पोलादी सुरक्षा व्यवस्था भेदून तीन कैदी पळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:50 PM

JailBreak : सुत्रानुसार, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व प्राणघातक हल्ला प्रकरणातील ते तीनही कैदी कारागृहातील बॅरेक नंबर १२ मध्ये होते. त्या बॅरेकच्या भिंतीवरून बाहेर पडत त्यांनी कारागृहाची भिंत देखील ओलांडली व कारागृहातून पळ काढला.

अमरावती: येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची पोलादी सुरक्षा व्यवस्था भेदून तीन कैद्यांनी पलायन केले. २८ जून रोजी पहाटे १.३० ते २ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.              

सुत्रानुसार, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व प्राणघातक हल्ला प्रकरणातील ते तीनही कैदी कारागृहातील बॅरेक नंबर १२ मध्ये होते. त्या बॅरेकच्या भिंतीवरून बाहेर पडत त्यांनी कारागृहाची भिंत देखील ओलांडली व कारागृहातून पळ काढला. साहिल अजमत कालसेकर (३३, नायसी, चिपळूण, जि. रत्नागिरी), सुमित शिवराम धुर्वे (३५) व रोशन गंगाराम उईके (२३, दोघेही रा. शेंदुरजनाघाट) अशी पसार कैदयाची नावे आहेत. यातील कळसेकर हा कलम ३०७ अन्वये दाखल प्रकरणात शिक्षा भोगत होता.

तर, सुमित धुर्वे व रोशन उईके यांना पोस्को व बलात्कार प्रकरणात दोषी मानण्यात आले होते. पहाटे २ च्या सुमारास अन्य काही कैदयांच्या देखत त्यांनी ‘जेलब्रेक’ केल्याचे सांगितले गेले. दोन ते तीन महिन्यांपुर्वी एक कैदी कारागृहातून पसार झाला होता. मात्र, तो बॅरेकमध्ये नव्हता. त्याला लागलीच पकडण्यात देखील आले. मात्र, मंगळवारी घडलेल्या घटनेत बॅरेकसह कारागृहाची भिंत देखील ओलांडण्यात आली.

टॅग्स :jailतुरुंगAmravatiअमरावतीPoliceपोलिसPrisonतुरुंग