शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

'आधी त्याने माझा गळा दाबला, नंतर गोळीबार सुरू केला...',आरोपी चेतनच्या सहकाऱ्याने सांगितला घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 1:05 PM

काल जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये मुंबईजवळ गोळीबार झाला, यात चार जणांचा मृत्यू झाला.

काल सोमवारी पालघर स्टेशनच्या आरपीएफ कॉन्स्टेबलने जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये गोळीबार केला. या गोळीबारात आरपीएफचा एएसआय आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. आरोपी कॉन्स्टेबल चेतन याला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, चेतनसोबत ट्रेनमध्ये तैनात असलेल्या आणखी एका जवानाने आता संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. चेतनने आधी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. मी चेतनने त्याच्याकडून रायफल काढून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच त्याने गोळीबार केला. आरोपी चेतनविरुद्धच्या एफआयआरमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल अमय घनश्याम आचार्य यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

आरडाओरडा करू नको म्हटलं, संशयिताने चिडून वृद्धाचा केला खून; साताऱ्यातील वडूथ येथील घटना

या जबाबामध्ये अमेयने यांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे ३० जुलै रोजी माझे सहकारी सौराष्ट्र मेल ट्रेनसह मुंबई सेंट्रलला निघाले. माझ्याकडे २० राउंड असलेली एआरएम रायफल, चेतनकडे २० राउंड असलेली एआरएम रायफल आणि एएसआय टिकाराम मीनाककडे १० राउंड असलेली पिस्तूल आणि हेड कॉन्स्टेबल नरेंद्र परमार यांच्याकडे १० राउंड असलेली पिस्तूल होती. घनश्याम आचार्य म्हणाले, "रात्री ०२:५३ वाजता, आम्ही जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढलो आणि मुंबईकडे प्रवास सुरू केला. ASI टिकाराम मीना आणि चेतन सिंह तिथे तैनात होते. मी आणि हेड कॉन्स्टेबल स्लीपर कोचमध्ये होतो.

घनश्याम आचार्य म्हणाले, "मी अहवाल देण्यासाठी टिकाराम यांच्या डब्यात गेलो असता त्यांनी मला चेतनची प्रकृती खालावल्याचे सांगितले. त्याला वलसाड स्टेशनवर टाका, असे चेतन सांगत होता. एएसआय टिकाराम मीणा यांनी त्यांना समजावून सांगितले की, दोन-तीन तासांची ड्युटी बाकी आहे, मुंबईपर्यंत ट्रेनमध्ये आराम करा. पण चेतन सिंह ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अशा स्थितीत टिकाराम यांनी अगोदर निरीक्षक आणि नंतर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. नियंत्रण कक्षाकडून चेतनला त्याची ड्युटी संपवून औषध किंवा विश्रांतीसाठी मुंबईला जाण्यास सांगा, असे सांगण्यात आले.

घनश्याम आचार्य म्हणाले, "यानंतरही चेतन ते ऐकण्यास तयार नव्हता. यानंतर टिकाराम म्हणाले, मी चेतनची रायफल घेतो आणि चेतनला आराम करू देतो. यानंतर चेतन रिकाम्या सीटवर झोपला. पण तो १०-१५ मिनिटांतच जागा झाला. यानंतर त्याने रायफल मागितली, तेव्हा मी ती देण्यास नकार दिला. अनेक वेळा विचारणा केल्यानंतर चेतनने माझा गळा दाबला. त्यानंतर त्याने माझी रायफल घेतली. मात्र, नंतर मी त्याला सांगितले की ही माझी रायफल आहे, त्यामुळे त्याने रायफल बदलली.” आचार्य यांच्या म्हणण्यानुसार, “रायफल ताब्यात घेतल्यानंतरही चेतन सिंह रागावला होता. त्याचवेळी एएसआय टिकाराम मीणा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मीही चेतनला हे समजावण्याचा प्रयत्न करत होतो. पण तो आम्हा दोघांचेही ऐकत नव्हता. म्हणून मी तिथून निघण्याचा निर्णय घेतला. यानंतर चेतन रायफलमधून गोळीबार करण्याच्या मूडमध्ये दिसला. म्हणूनच मी टिकारामला सांगितले. त्यांनी चेतनला भेटून प्रेमाने त्याला शांत राहण्यास सांगितले.

घनश्याम म्हणाले, “मी पॅन्ट्री कारमध्ये गेलो. ०५.२५ च्या सुमारास कॉन्स्टेबल कुलदीप राठोड यांना फोन आला, त्यांनी सांगितले की टीमचे प्रभारी एएसआय टिकाराम मीना यांना गोळी मारण्यात आली आहे. यानंतर मी तातडीने हवालदार नरेंद्र कुमार यांना याची माहिती दिली. चेतनने ट्रेनमध्ये गोळीबार केला घनश्याम आचार्य यांनी सांगितले की, "तेव्हाच समोरून दोन-तीन प्रवासी धावत आले. ते घाबरलेले दिसत होते. माझ्यासोबत असलेल्या एएसआय टिकाराम मीणाला माझा सहकारी चेतन सिंहने गोळ्या झाडल्याचंही त्याने सांगितलं. मी हवालदार नरेंद्र परमार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली आणि ते सुरक्षित असल्याची खात्री केली.

घनश्याम आचार्य यांनी सांगितले की, चेतन सिंहने आपली रायफल ट्रेनकडे रोखली मी पाहिले. आणि मध्येच तो गोळीबारही करत होता. मी काही बंदुकीच्या गोळ्या ऐकल्या. मी थोडा वेळ बाथरूममध्ये लपून बसलो. यानंतर चेतन ट्रेनमधून खाली उतरला. त्याच्या हातात रायफल होती. सुमारे १५ मिनिटांनंतर ट्रेन पुन्हा सुरू झाली तेव्हा मला दिसले की प्रवाशांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. ०६.२० च्या सुमारास ट्रेन बोरिवली स्टेशनवर थांबली आणि मी खाली उतरलो. टिकाराम मीना व इतरांना तिथल्या ट्रेनमधून खाली उतरवण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्या चार जणांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :FiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे