शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

लुडो खेळण्यापासून रोखल्यानं दोन बहिणींनी घर सोडलं; हैदराबाद गाठलं, मुंबईत करायची होती नोकरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 10:49 AM

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये दोन मुलींच्या ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे त्यांच्या वडिलांना भीषण अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये दोन मुलींच्या ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे त्यांच्या वडिलांना भीषण अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. वडिलांनी आपल्या दोन अल्पवयीन मुलींना लुडो गेम खेळण्यापासून रोखलं. याचा मुलींना इतका राग आला की त्यांनी मध्यरात्री कुणालाही न सांगता घर सोडलं. 

जयपूरच्या मुहाना मंडीतील एका फळ विक्रेत्यानं आपल्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ४ दिवसांच्या शोधानंतर दोन्ही अल्पवयीन मुली अहमदाबाद स्टेशनवर सापडल्या. लुडो गेम खेळण्यापासून वडील रोखत असल्यानं मुली नाराज झाल्या आणि याच गेमच्या माध्यमातून ओळख झालेल्या मित्रांना भेटण्यासाठी त्या घरातून पळून गेल्या. जयपूरच्या मुहाना पोलिसांनी अहमदाबाद जीआरपी पोलिसांच्या मदतीने दोघांना मुंबईला जात असताना स्टेशनवर पकडलं. यापूर्वी दोघीही हैदराबादला गेल्या होत्या.

२९ ऑक्टोबर रोजी मुहाना मंडीतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पोलीस सतत शोध मोहीम राबवत होते. त्याचवेळी अनुक्रमे १६ व १४ वर्षांच्या या दोन मुली २८ ऑक्टोबरच्या रात्रीपासून घरातून बेपत्ता असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. रात्री दीड वाजेपर्यंत दोघांनाही हॉलच्या बाहेर झोपलेलं पाहिल्याचं वडिलांनी सांगितलं, त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास दोघेही बेपत्ता झाल्या होत्या.

लुडोसाठी घर सोडलंऑनलाइन लुडो गेम खेळल्यावरुन घरात वडिलांसोबत वाद झाल्यानं हैदराबाद आणि मुंबईतील आपल्या मित्रांना भेटायला गेल्याचं पोलिसांच्या चौकशीत दोन्ही मुलींनी सांगितलं. घरातून बाहेर पडताना त्यांनी गेमशी संबंधित मित्रांशी संपर्क साधला आणि हैदराबाद आणि मुंबईला जाण्याचा प्लॅन बनवल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दोन्ही मुलींनी घरातून सुमारे साडेतीन हजार रुपये घेतले आणि आधी हैदराबाद गाठलं. त्याचवेळी दोघीही ऑनलाइन लुडो गेम खेळणाऱ्या त्यांच्या मित्राच्या घरी पोहोचल्या, त्यानंतर दोघांनीही तिथे राहण्यासाठी भाड्याने खोली पाहण्याचा प्रयत्न केला.

इन्स्टाग्राम मेसेजनं पकडलंदरम्यान, लुडो खेळणाऱ्या मैत्रिणींच्या मोबाईलवरून एका मुलीनं तिच्या मावशीला १ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर मेसेज केला, त्यानंतर काकूने बेपत्ता भाचीच्या मेसेजची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी मेसेजवरून लोकेशनची माहिती गोळा केली. लोकेशनच्या आधारे पोलिसांचं एक पथक हैदराबादला पोहोचलं पण यादरम्यान दोन्ही बहिणी ट्रेनमध्ये बसून मुंबईला जाण्याचा विचार करत होत्या. दरम्यान, लहान बहिणीला जयपूरला यायचं होतं मात्र मोठ्या बहिणीला मुंबईला जाऊन नोकरी करायची होती. दरम्यान, पोलीस त्यांचा सतत पाठलाग करत होते आणि मुंबईच्या दिशेनं निघण्यापूर्वी पोलिसांच्या पथकानं जीआरपीशी संपर्क साधून बेपत्ता झालेल्या दोन्ही अल्पवयीन बहिणींना मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमधून उतरवलं आणि गुरुवारी जयपूर पोलिसांनी दोन्ही बहिणींना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी