शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

यूपीच्या सहारनपूरमधून दहशतवाद्याला अटक, नुपूर शर्मांची हत्या करण्याचा होता प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 8:15 PM

jaish terrorist arrest in saharanpur : दहशतवाद्याच्या फोनची तपासणी केली असता त्यात Explosive Course Fidae Force असे शिर्षक असलेले डॉक्युमेंट सापडले.

सहारनपूर : उत्तर प्रदेशातएटीएसने सहारनपूरमधून जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबानशी संबंधित दहशतवाद्याला अटक करून मोठा कट उधळून लावला. मोहम्मद नदीम असे या दहशतवाद्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. तसेच, एटीएसच्या चौकशीदरम्यान या दहशतवाद्याने सांगितले की, पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने त्याला भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्याचे काम दिले होते.

एटीएसने एक प्रेस नोट जारी करून सांगितले की, यांसदर्भात एजन्सीला माहिती मिळाली होती की, सहारनपूरमधील गंगोह पोलिस स्टेशनच्या कुंडाकलन गावात एक व्यक्ती जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) संघटेनवर प्रभावित होऊन दहशतवादी हल्ल्याची तयारी करत  आहे. यानंतर मोहम्मद नदीमची ओळख पटवून त्याची चौकशी करण्यात आली. तहरीक-ए-तालिबानचा दहशतवादी सैफुल्ला (पाकिस्तान) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहम्मद नदीमला दहशतवादी हल्ल्याच्या तयारीसाठी प्रशिक्षण साहित्य पुरवले होते. याच्या मदतीने सर्व सामान गोळा करून कोणत्याही सरकारी इमारतीवर किंवा पोलिसांच्या जागेवर हल्ला करण्याचा मोहम्मद नदीमचा कट होता.

दहशतवाद्याच्या फोनची तपासणी केली असता त्यात Explosive Course Fidae Force असे शिर्षक असलेले डॉक्युमेंट सापडले. तसेच, मोहम्मद नदीमच्या फोनवरून जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या टीटीपी दहशतवाद्यांच्या चॅट आणि ऑडिओ मेसेज मिळाले आहेत. मोहम्मद नदीमने चौकशीदरम्यान सांगितले की, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, आयएमओ, फेसबुक मेसेंजर, क्लबहाऊस या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे 2018 पासून तो जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तानच्या संपर्कात आहे. त्याने या दहशतवाद्यांकडून व्हर्च्युअल नंबर बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. दहशतवादी संघटनांनी त्याला व्हर्च्युअल सोशल मीडिया आयडी बनवून 30 हून अधिक व्हर्च्युअल नंबर दिले होते.

विशेष प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला जाणार होताएटीएसने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या जैश आणि टीटीपीच्या दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी हे दहशतवादी मोहम्मद नदीमला पाकिस्तानात बोलावत होते. तो लवकरच व्हिसा घेऊन पाकिस्तानला जाणार होता. यानंतर तो इजिप्तमार्गे सीरिया आणि अफगाणिस्तानात जाण्याचा विचार करत होता. भारतातील दहशतवाद्याच्या संपर्कात आणखी काही लोक असल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे. सध्या त्यांच्या अटकेसाठी एटीएसनेही कारवाई सुरू केली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAnti Terrorist SquadएटीएसterroristदहशतवादीCrime Newsगुन्हेगारी