जळगाव : ओळखीतून मैत्री, मैत्रीतून प्रेमसंबंध आणि त्यातून एकमेकांसोबत काढलेले फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देत २१ वषर्पय तरुणीशी शारीरीक संबंध प्रस्थापित करणाऱ्या नरेंद्र ज्ञानदेव सोनवणे (२४, रा.मेस्को माता नगर) या तरुणाविरुद्ध मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २१ वषीय तरुणी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे. मार्च २०१९मध्ये या महाविद्यालयात मराठी चित्रपटासाठी ऑडिशन्स असल्याने नरेंद्र सोनवणे हा कॅमेरामन म्हणून तेथे आलेला होता. त्यावेळी पीडित व त्याच्यात ओळख झाली. त्यानंतर मोबाईल व सोशल मीडियावर सतत संपकार्त राहू लागले. याच काळात नरेंद्र याने युवतीला प्रेमाचा स्वीकार कर म्हणून विनंती केली. त्यावेळी युवतीने मला प्रेम करावयाचे नसून लग्न करायचे आहे असे सांगून प्रेमास नकार दिला. त्यावर त्याने मी लग्नासाठी तयार आहे व त्यासाठी मला कुटुंबाला काही गोष्टी सांगाव्या लागतील असे सांगून सप्टेबर २०१९ मध्ये महाविद्यालयातून अजिंठा चौकातील हॉटेल प्रिन्समध्ये घेऊन गेला. येथे कशासाठी आणले असे विचारले असता, तुझ्याशी लग्नाबाबत काही गोष्टी बोलायच्या आहेत म्हणून येथे आलो असे सांगून बायोडाटा दे वगैरे गोड बोलत जबरदस्तीने शारीरीक संबंधासाठी आग्रह केला. त्यास युवतीने विरोध दर्शविला असता आपण लग्न करणारच आहोत असे म्हणत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यावेळी नरेंद्र याने त्याची मोठी बहिण मेघा सचिन सपकाळे हिच्याशी बोलणे करुन दिले. तेव्हा त्याच्या बहिणीने जळगावात आल्यावर कुटुंबाशी बोलेन असे सांगितले तर याबाबत युवतीने मैत्रीणीचाही सल्ला घेतला असता तिनेही कुटुंबाशी बोलूनच काय तो निर्णय घे म्हणून सल्ला दिला.हॉटेलमध्ये तीन वेळा अत्याचारदरम्यान, १८ ऑक्टोबर २०१९ व १९ मार्च २०२० या या दिवशी देखील नरेंद्र याने प्रिन्स हॉटेलमध्ये आणले व शारीरीक संबंधासाठी जबरदस्ती करु लागला, तेव्हाही नकार दिला असता आपण काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रत्येक वेळी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन शारीरीक संबंध ठेवले व लग्नही केले नाही. त्यामुळे युवतीने सोमवारी रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. दरम्यान, रात्री पाचोरा पोलीस ठाण्याच्या परिविक्षाधीन महिला उपनिरीक्षक विजया वसावे यांनी पीडित युवतीची फियार्द घेऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर कॉ.मुकेश पाटील, विजय बाविस्कर यांनी नरेंद्र सोनवणे याला अटक केली. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक अमोल मोरे व रतिलाल पवार करीत आहेत.
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीशी शारीरिक संबंध; फोटोग्राफर तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 3:04 PM