शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

पोलीस अधीक्षकांचे बनावट फेसबुक खाते तयार करून पैशाची मागणी;मित्राला ५० हजारांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 11:24 AM

जळगाव येथील तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा पुणे शहर पोलीस दलातील अप्पर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून पैशाची मागणी केली जात आहे.

जळगाव : येथील तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा पुणे शहर पोलीस दलातील अप्पर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून पैशाची मागणी केली जात आहे. डॉ.सुपेकर यांच्या एका मित्राला ५० हजारांचा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील फेसबुक मित्रांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर सुपेकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला व हे खाते तात्काळ बंद केले.

सध्या गुन्हेगारीचे स्वरुप बदलत चालले असून अगदी कमी श्रम व कमी वेळेत झटपट पैसे कमवण्यासाठी ऑनलाईन, सोशल मीडियाचा गैरवापर केला जात आहे. फेसबुकवर बनावट खाते तयार करून त्याद्वारे संबंधित व्यक्तीच्या मित्रांना पैशांची मागणी करणे तसेच अश्लील फोटो, व्हिडिओ तयार करुन शेअर करण्याची धमकी देत लाखो रुपये खंडणी स्वरूपात उकळण्याचे नवे उद्योग सुरू झाले आहेत. यात विशेष करून उच्चभ्रू लोकांना टार्गेट केले जात आहे. 

जळगावच्या मित्रांमुळे उघड झाला प्रकार

असाच प्रकार जळगावला पोलीस अधीक्षक राहिलेले डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या बाबतीत घडलेला आहे. डॉ.सुपेकर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुक खाते तयार केले, त्यात या व्यक्तीने त्यांच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. या रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. पुण्यातील व्यापारी असलेल्या मित्राने खरच पैशाची गरज असेल म्हणून ५० हजार रुपये ऑनलाईन पाठवले. दरम्यान, सुपेकर यांच्या नावाने बनावट खाते तयार झाल्याचे जळगाव मधील मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ हा प्रकार सुपेकरांना कळविला. सुपेकर यांनी त्याची दखल घेऊन शिवाजी नगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून हे खाते ब्लॉक केले. हे खाते फेक असून कोणीही यावर पैशाचा व्यवहार करू नये असे आवाहन त्यांनी केले.

त्यांचा हा मेसेज बघितल्यानंतर ज्या मित्राने ५० हजार रुपये पाठवले, त्यांनी  डॉ.सुपेकर यांच्याशी संपर्क केला व आपण ५० हजार पाठविल्याचे त्यांना सांगितले. सुपेकर यांनी तातडीने सूत्र हलविल्यानंतर नऊ हजार रुपये थांबवण्यात यश आले,अन्यथा ही रक्कमही सायबर गुन्हेगाराच्या हातात गेली असती. गेल्याच आठवड्यात जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील व रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक परदेशी यांच्या नावाचे बनावट खाते तयार करण्यात आले होते. जळगावला अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या नावाने बनावट तयार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

फेसबुकचे फेक खाते ब्लॉक करण्यात आलेले आहे. याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. सायबर गुन्हेगारीचा हा प्रकार असून मोठ्या प्रमाणात असे प्रकार होऊ लागले आहेत,त्यामुळे कोणीही अशा प्रकारांवर विश्वास ठेवून व्यवहार करू नये. आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी ते ब्लॉक करावे व असा प्रकार समोर आलाच तर तात्काळ पोलिसात तक्रार करावी. - डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस आयुक्त,पुणे

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमJalgaonजळगावPoliceपोलिस