बडगाम पोलिसांनी एका विशिष्ट माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत ५३ आरआर सैन्य आणि सीआरपीएफच्या मदतीने बंदी घातलेल्या लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित तिघांना अटक केली. तसेच अटक केलेले तिघेजण इतर दहशतवादी संघटना म्हणजेच तहरीक उल मुजाहिद्दीनसाठीही कार्यरत होते. गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. याच दरम्यान जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी सैन्याच्या एका टीमवर ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले होते. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं.
Jammu And Kashmir : कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार जवान जखमी
जम्मू-काश्मीरच्या लखनपूरमध्ये लष्काराचे हेलिकॉप्टर क्रॅश, दोन जवान गंभीर जखमी
अलीकडेच कुलगाम जिल्ह्यातील खानबलच्या शमशीपोरा बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सॅनिटेशन ड्रिलदरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.