शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

पाकिस्तानमध्ये डी कंपनीशी जानचे २० वर्षापूर्वीचे संबंध; पायधुनी पोलीस ठाण्यात गोळीबाराची केस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 3:19 PM

ATS on Jan Mohammad Shaikh : शेख हा एकटाच दिल्लीला निघाला होता. ९ सप्टेंबरला तो तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता.

ठळक मुद्देपाकिस्तानमध्ये डी कंपनीसोबत संबंध २० वर्षांपूर्वी असून सध्या त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती, अशी खळबळजनक माहिती एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी दिली. 

दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी काल ६ दहशतवाद्यांना अटक केली.  अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांपैकी एकमुंबईच्या सायन परिसरातील धारावीचा रहिवासी आहे. जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं या धारावीतील संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. शेख हा एकटाच दिल्लीला निघाला होता. ९ सप्टेंबरला तो तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. पाकिस्तानमध्ये डी कंपनीसोबत संबंध २० वर्षांपूर्वी असून सध्या त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती, अशी खळबळजनक माहिती राज्याचे एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी दिली. 

शेख एकटाच मुंबई सेंट्रल ते निजामुद्दीनदरम्यान प्रवासाचं तात्काळ तिकीट घेऊन १३ सप्टेंबरला निघाला. ९ तारखेला तो दिल्लीला जाणार होता. मात्र, तिकीट मिळालं नाही, नंतर १० तारखेला पैसेही पाठवले होते. नंतर १३ तारखेला जाण्याचं तात्काळ तिकीट वेटिंग काढलं आणि जान गोल्डन एक्स्प्रेस ट्रेनच्या एस ६ डब्ब्यातून निजामुद्दिनसाठी १३ सप्टेंबरला रवाना झाला. प्रवासादरम्यान शेखला दिल्ली पोलिसांनी कोटा येथे रोखले आणि अटक केली. त्यावेळी त्याच्याकडे कोणतेही शस्त्र सापडले नाही. मात्र, का अटक केली हे दिल्ली पोलीस सांगू शकतील. आमची टीम आज सायंकाळी दिल्लीला जाणार असून ते या सर्व बाबींची चौकशी करतील. आम्ही देखील आमच्याकडील सर्व माहिती दिल्ली पोलिसांना देऊ. मात्र, या दहशतवादी कृत्याबाबत पूर्व कल्पना केंद्रीय यंत्रणांना होती. त्यांनी ती दिल्ली पोलिसांना दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुढे विनीत अगरवाल यांनी दिली. 

जानचा नेमका क़ाय कट होता, याबाबतच्या चौकशीसाठी एटीएस पथक दिल्लीला जाणार असल्याचे एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी सांगितले. तसेच पुढे ते म्हणाले, जानला कर्ज होतं. पैशाची गरज होती. कर्ज काढून टॅक्सी घेतली होती. त्यानंतर एक बाईक देखील घेतली होती. याचे कर्ज जान परतफेड करून शकला नाही. पैशांसाठीच तो यात सहभागी झाल्याची शक्यता असून अधिक तपास सुरु असल्याचे एटीएस प्रमुखांनी सांगितले. तसेच रेकीचं वृत्त चुकीचं असून शेखविरोधात पायधुनी पोलीस ठाण्यात गोळीबार आणि मारहाण प्रकरणी गुन्हे नोंद आहेत. 

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसMumbaiमुंबईTerrorismदहशतवादterroristदहशतवादी