Bilkis Bano Case : गुजरातच्या गोध्रा येथे जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या ११ आरोपिंची १५ ऑगस्टला मुक्तता करण्यात आली. गुजरातमध्ये गाजलेल्या बिलकिस बानो बलात्कार प्रकरणातील हे सर्व आरोपी होते. त्यांनी ५ वर्षीय गर्भवतीवर बलात्कार करून तिच्या कुटुंबातील ३ वर्षीय मुलीसह ७ जणांची हत्या केली होती. गुजरात सरकारच्या या निर्णयावर बिलकिस बानो आणि त्यांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांनी आता सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे. अशात कारागृहातून मुक्तता झालेल्या या आरोपिंची पेढे भरवून व पुष्पहार घालून स्वागत केले गेले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ज्येष्ठ संगीतकार जावेद अख्तर ( Javed Akhtar) यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
२७ फेब्रुवारी २००२मध्ये साबरमती एक्सप्रेसला गोध्रा स्टेशन जवळ आग लावली गेली. त्यात आयोध्या येथून परतणाऱ्या ५९ श्रद्धाळूंचा मृत्यू झाला. त्यानंतर गुजरातमध्ये दंगल भडकली. मार्च २००२मध्ये दंगल बिलकिसच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. २१ वर्षीय बिलकिससह साडेतीन वर्षांची मुलगी व १५ सदस्य घरात राहत होते. चार्जशीटच्या नुसार २०-३० लोकांनी हत्यार घेऊन बिलकिसच्या कुटुंबावर हल्ला केला. त्यात हे ११ लोकंही होते.
या हल्लेखोरांनी बिलकिस, तिची आई व कुटुंबातील अन्य तीन महिलांवर बलात्कार केला. त्यांना मारहाण केली. १७ पैकी ७ सदस्यांचा मृत्यू झाला. ६ जणं बेपत्ता झाले आणि केवळ ३ जण वाचले. ही घटना घडली तेव्हा बिलकिस पाच महिन्यांची गर्भवती होती. घटनेनंतर बिलकिसने लिमखेडा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास CBI कडे गेला आणि त्या ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ११ आरोपींपैकी एक राधेश्याम शाहने सर्वोच्च न्यायालयात शिक्षा माफ व्हावी यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हा निर्णय गुजरात सरकारला घेण्यास सांगितले आणि सरकारने एक कमिटी स्थापन करून त्यांची शिक्षा माफ केली.
जावेद अख्तर कायम म्हणाले?५ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार करून तिच्या ३ वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील ७ जणांची हत्या करणाऱ्या आरोपींची सुटका होताना त्यांना मिठाई भरवून व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. आपल्या समाजात काहीतरी गंभीरपणे चूक होत आहे.