केस कापताना महिलेच्या डोक्यात थुंकणाऱ्या जावेद हबीबने आता एक व्हिडिओ जारी करून जाहीर माफी मागितली आहे. यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल माफी मागतो, असे त्याने म्हटले आहे. यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशपोलिसांना पत्र लिहून हबीबवर केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. हबीबच्या अटकेसाठी हिंदू संघटनांनी निदर्शनेही केली.पीडितेने मन्सूरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाहा व्हिडिओ ६ जानेवारी रोजी समोर आला, त्यानंतर तो व्हायरल झाला. पूजा गुप्ता असे या महिलेचे नाव आहे. ती मूळची बागपत जिल्ह्यातील बरौत शहरातील असून ब्युटी पार्लर चालवते. याप्रकरणी पूजाने जावेद हबीबविरुद्ध मुझफ्फरनगरमधील मन्सूरपूर पोलिस ठाण्यात ६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. हबीबविरुद्ध आयपीसी कलम ३५५, ५०४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतरच त्याच्या अटकेसाठी हिंदू संघटनांनी निदर्शने केली.
तिथे काय झाले?कार्यशाळेदरम्यान जावेद हबीब यांनी महिलेच्या केसांवर थुंकताना इस थूक में दम है असं हबीबने सांगितले. त्याने महिलेचा अपमान केला आणि सांगितले की तिचे केस खराब आहेत, कारण तिने शॅम्पू केला नाही. यानंतर, महिलेच्या केसांना विंचरताना तो म्हणतो की, केसांमध्ये पाण्याची कमतरता असल्यास, थुंकीने काम करा. यानंतर त्याने महिलेच्या केसांवर थुंकले. त्यावेळी संकोचामुळे महिलेला प्रतिक्रिया देता आली नाही. याबाबत जावेद हबीबी यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती.