देवास - सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून लागवड केलेले सोयाबीनचे पीक जेसीबीच्या सहाय्याने हटवताना प्रशासनातील अधिकाऱ्यांना रोखण्यासाठी शेतकरी महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्या महिलेने अतिक्रमणावर कारवाईदरम्यान शेतातच स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत २० टक्के भाजलेल्या महिलेला उपचारासाठी इंदोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देवास जिल्ह्यात सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. प्रशासनातील अधिकारी कारवाई करण्यासाठी गेले असता, जवळपास १२ शेतकऱ्यांनी पोलीस पथक आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला केला. तसेच कारवाई रोखण्यासाठी एका महिला शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. देवास येथील अतवास येथे महिला शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. महिला शेतकरी आणि तिच्या कुटुंबीयांनी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन अधिकारी जखमी झाले.
मंगळवारी रात्री ११ या प्रकरणी फिर्यादी किशोर चावरे यांच्या तक्रारीवरून आरोपी छोटा, रमजान खां, शरीफ खांन, शेर खां, हबीब खां, मोइन खां, शहीद खां, सफदर खां, हमीद खां, अनीसा बी, साबरा बी यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप
लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त
स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव
भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू
Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न