शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

ICICI च्या सेफ्टी लॉकरमधून चोरट्यांनी ५ कोटींचे दागिने केले लंपास, नाशिकमधील घटना

By अझहर शेख | Published: May 05, 2024 11:38 PM

या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखा युनिट-१चे पथक चोरांचा माग काढत आहे.

अझहर शेख, नाशिक: ICICI होम फायनान्स कंपनीच्या जुना गंगापुरनाका शाखेतील सेफ्टी लॉकर किल्लीने उघडून दोघा अज्ञात इसमांनी सुमारे ४ कोटी ९२ लाख रूपये किंमतीचे सुमारे दीड किलो सोन्याचे दागिने लांबिवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी फायनान्स कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखा युनिट-१चे पथक चोरांचा माग काढत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या जुना गंगापुर नाका परिसरात प्रमोद महाजन उद्यानाला लागून असलेल्या इंदिरा हाइट्स व्यापारी संकुलात आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीचे कार्यालय वरील मजल्यावर आहे. या कार्यालयात असलेल्या सेफ्टी लॉकरमध्ये सुमारे २२२ग्राहकांचे १३,३८५.५३ ग्रॅम इतक्या वजनाचे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. शनिवारी (दि.४) सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास शाखा व्यवस्थापक चंद्रकांत मुठेकर यांनी कार्यालय उघडून नियमितपणे कामकाजाला सुरूवात केली. गोल्ड लोन सर्व्हिस असोसिएट किरण जाधव हे कंपनीमध्ये काम करत असताना संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास एका ग्राहकाचे सोन्याचे दागिने कंपनीच्या सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले.

यावेळी त्यांच्याकडे असलेल्या एक किल्ली व क्रेडिट मॅनेजर सिद्धांत इकनकर यांच्याकडे असलेली दुसरी किल्लीने लॉकर उघडले. यावेळी हे लॉकर पुर्णपणे रिकामे असल्याचे त्यांना दिसताच पायाखालची वाळू सरकली. जाधव यांनी त्वरित क्रेडिट व्यवस्थापक रणजित देशमुख यांना माहिती कळविली. देशमुख यांनी प्रशासकीय व्यवस्थापक फिर्यादी जयेश कृष्णदास गुजराथी (३४,रा.पाथर्डीफाटा) यांना माहिती कळविली. त्यांनी कार्यालयात धाव घेत पाहणी केली असता लॉकर रिकामे असल्याचे दिसून आले. त्यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ICICI HFC ने या चोरीच्या घटनेसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असून सखोल तपास करण्याची विनंती केली आहे. तपास यंत्रणेकडून होत असलेल्या तपासात ICICI HFC पूर्णपणे सहकार्य करत आहे आणि ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही देत आहे, असे स्टेटमेंट व्यवस्थापनाकडून जारी करण्यात आले आहे.

टॅग्स :RobberyचोरीICICI Bankआयसीआयसीआय बँकNashikनाशिक