लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : मुंबई - पुणे एक्स्प्रेस हायवेवरील खोपोली हद्दीत असलेल्या फूड माॅल पार्किंगमध्ये असलेल्या वाहनातून २ किलो ७३२ ग्रॅमचे दागिने व सोन्याची बिस्किटे चोरीला गेली होती. आरोपीने डम्प करून ठेवलेल्या जागेवरून मुद्देमाल मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीतील फरार मुख्य आरोपी पप्पू बाबू खान मुलतानी याचा पोलिस शोध घेत आहेत.
आरोपीने १ कोटी ४४ लाख रुपयांचे एकूण २ किलो ७३२ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे तसेच दागिने चोरले होते. या गुन्ह्याचा तपास लवकर व्हावा, यासाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अधिकारी व पोलिस अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार केली होती. एका पथकामार्फत अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच बाहेरील राज्यांतील आरोपींच्या यादीतील गुन्हेगारांमध्ये शोध घेणे तसेच दुसऱ्या पथकामार्फत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्याचे काम सुरू होते.
असा लागला चोराचा ठावठिकाणा तपास पथकाला घटनास्थळवरील सीसीटीव्हीमध्ये संशयित आरोपींचे फोटो मिळाले होते. संशयित आरोपींच्या फोटोंच्या सहाय्याने तसेच गुप्त बातमीदारामार्फत असे गुन्हे करणारे आरोपी हे मध्य प्रदेश राज्यातील खैरवा येथील असल्याची माहिती मिळाली. या बातमीची खातरजमा करण्यासाठी पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, पोलिस हवालदार राजेश पाटील, यशवंत झेमसे व प्रतीक सावंत असे पथक मध्य प्रदेशकडे रवाना झाले.
साथीदाराने दिली चोरीची कबुलीn सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी पप्पू बाबू खान मुलतानी हा मध्य प्रदेश येथे असल्याची खात्री झाली. त्यामुळे तत्काळ संशयित आरोपी पप्पू बाबू खान याच्या घरी छापा टाकला. n मात्र आरोपी तेथे नव्हता. त्याच्या घराची झडती घेतली असता, काहीच सापडले नाही. त्यानंतर आरोपीचा सख्खा भाऊ इस्माइल बाबू खान (२७) याची चौकशी केली असता, त्याने पप्पू बाबू खान याने त्याच्या साथीदारांसह चोरी केल्याचे कबूल केले. n तसेच त्याच्याकडे ठेवण्यास दिलेली २.६८४ किलो ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे व दागिने असा मुद्देमाल पोलिसांना दिला.