शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

रेल्वे तिकीटाच्या रांगेत उभा होता तरुण, चोरट्यांनी चेहऱ्यावर भाजी फेकली अन् सोन्याची चेन खेचून पळाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 6:58 PM

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. यातच सोनसाखळी चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत.

नवी दिल्ली-

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. यातच सोनसाखळी चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या झाशी रेल्वे स्थानकात मध्य प्रदेशातील एक प्रवासी अशाच एका सोनसाखळी चोरीचा शिकार बनला आहे. 

तरुण जबलपुरला जाण्यासाठी झाशीच्या रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी रांगेत उभा होता. यातच काही चोरट्यांनी त्याच्या चेहऱ्यावर भाजी फेकली. गडबडलेल्या तरुणानं चेहऱ्यावरील भाजी बाजूला सारणार इतक्यातच चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचली आणि पळ काढला. 

पीडित युवक अखिलेश मध्य प्रदेशच्या टीकमगढ येथील रहिवासी आहे. तो झाशी रेल्वे स्थानकाहून जबलपूर येथे जात होता. अखिलेशनं दिलेल्या माहितीनुसार ही घटना झाशीच्या रेल्वे तिकीटाच्या रांगेत त्याच्यासोबत घडली. याच दरम्यान काही लोक त्याच्याजवळ आले आणि त्याच्या चेहऱ्यावर भाजी फेकली. तो डोळे आणि चेहरा स्वच्छ करणार इतक्यातच त्या चोरट्यांनी गळ्यातील सोन्याची चेन खेचली व पळ काढला. 

अखिलेशनं तातडीनं याची माहिती स्थानिक रेल्वे प्रशासनाला दिली. पण कोणतीही मदत आपल्याला मिळू शकली नाही असा आरोप त्यानं केला आहे. यातच जबलपूरची रेल्वे देखील आली ज्यात त्याला चढावं लागलं आणि रेल्वेत चढल्यानंतर अखिलेश यानं घडलेल्या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. 

रेल्वेत चढला नसता तर मदतीची शक्यता होती- पोलीसविना तिकीट रेल्वे प्रवास केल्यामुळे अखिलेशवर टीसीनं कारवाई केली आणि दंड भरण्याची मागणी केली. अखिलेश यानं दिलेल्या माहितीनुसार तो दंडाची रक्कम भरण्यासाठी देखील तयार झाला. पण तरीही टीसी आणि पोलिसांनी त्याची कोणतीही मदत केली नाही. तर घटनास्थळावर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार अखिलेश यानं रेल्वेत न चढता तातडीनं पोलिसात तक्रार केली असती तर मदत करता आली नसती. सणासुदीच्या काळामुळे रेल्वेसह इतर सर्वच सार्वजनिक ठिकाणी लोकांची मोठी गर्दी उसळत आहे. अशात अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी