तुफान राडा! जमिनीसाठी भाजपा आमदाराचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले; हाणामारीसह गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 10:44 AM2021-08-12T10:44:01+5:302021-08-12T10:53:11+5:30
BJP And Congress : जमिनीसाठी भाजपा आमदाराचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडल्याची घटना घडली असून तुफान राडा झाला आहे.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर य़ेत आहेत. अशीच एक भयंकर घटना झारखंडमध्ये घडली आहे. जमिनीसाठी भाजपा आमदाराचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडल्याची घटना घडली असून तुफान राडा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनबादमधील भाजपा आमदार ढुल्लू महतो यांचे समर्थक हे जमिनीवर कब्जा करण्यासाठी एका ठिकाणी पोहोचले होते. तेव्हा काँग्रेस समर्थकांनी त्यांना विरोध केला. यावरूनच भाजपा आमदाराचे समर्थक आणि काँग्रेसचे काही कार्यकर्ते आपापसात भिडले. या हाणामारीत अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
धनबादच्या बाघमारा मुहदा पोलीस ठाणे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. ढुल्लू महतो यांचे समर्थक एका जमिनीवर कब्जा करण्यासाठी पोहोचले होते. तिथेच काँग्रेस समर्थकांसोबत संघर्ष झाला. याच दरम्यान घटनास्थळी गोळीबार झाला. दहा राऊंड फायरिंग करण्यात आलं. या भयंकर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी समजावून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच दरम्यान हाणामारी आणि संघर्षामध्ये अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र अद्याप यामध्ये कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हाणामारीमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. तसेच घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) भाजपा आणि वायएसआर काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचं युद्ध आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. वायएसआर काँग्रेसचे आमदार शिवप्रसाद रेड्डी यांनी भाजपाचे नेते एस. विष्णुवर्धन रेड्डी यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. यावरून राजकारण तापलं आहे.
वायएसआर काँग्रेसच्या आमदाराने भाजपा नेत्यावर केला भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप #BJP#Politics#corruptionhttps://t.co/cvOhYIqH30
— Lokmat (@MiLOKMAT) August 11, 2021
राजकारण तापलं! 'मी भ्रष्टाचारी नाही', भाजपा नेत्याने मंदिरात जाऊन घेतली शपथ; 'हे' आहे कारण
आपल्यावर झालेल्या आरोपानंतर भाजपाचे नेते एका मंदिरात पोहोचले आणि तिथे 'मी भ्रष्टाचारी नाही' अशी शपथ घेतल्याची घटना घडली आहे. भाजपाचे नेते जी. विष्णुवर्धन रेड्डी चित्तूर जिल्ह्यातील विनायकस्वामी मंदिरात पोहोचले. जिथे त्यांनी देवासमोर 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कधीच भ्रष्टाचार केला नसल्याची शपथ घेतली आहे. प्रॉद्दातूर परिसरातील टिपू सुलतानच्या पुतळ्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. भाजपा याला विरोध करत आहे आणि स्थानिक प्रशासनाला पुतळा बसवू देत नाही. ज्यानंतर वायएसआर काँग्रेसचे आमदार शिवप्रसाद रेड्डी यांनी भाजपा नेत्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.
संतापजनक! दारूच्या नशेत दोन मुलांनी 80 वर्षीय आईला केली बेदम मारहाण; मन सुन्न करणारी घटना#Crime#Police#Arresthttps://t.co/baeS4TY2LJ
— Lokmat (@MiLOKMAT) August 11, 2021
Corona Vaccination : बापरे! लसीसाठी महिलांनी एकमेकींचे केस ओढले, जमिनीवर आपटलं; तुफान हाणामारीचा Video जोरदार व्हायरल#CoronavirusIndia#CoronaVaccination#CoronaVaccinehttps://t.co/q42Ud4D7la
— Lokmat (@MiLOKMAT) August 10, 2021