शिक्षकावर विद्यार्थ्यांचं भविष्य घडविण्याची जबाबदारी असते असं आपण म्हणतो. पण झारखंडमधील एका शिक्षकानं लाजिरवाणं कृत्य करत शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचं काम केलं आहे. पश्चिम सिंगभूम (चायबासा) जिल्ह्यातील बराजमदा ओपी परिसरात असलेल्या खासजमदा सरकारी अपग्रेडेड मिडल स्कूलमध्ये शिकवणारे शिक्षक प्रेम कुमार कथितरित्या दररोज शालेय मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत असे. पालकांना या प्रकाराची माहिती मिळताच त्याला आज पहाटे स्थानिक ग्रामीण महिलांनी पकडलं आणि चोप दिला. शिक्षकाच्या चेहऱ्यावर काळं फासून गळ्यात चपलांचा हार घालून संपूर्ण गावात या शिक्षकाची धिंड काढण्यात आली आहे.
पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील बराजमदा ओपी येथे असलेल्या खासजमदा सरकारी अपग्रेडेड मिडल स्कूलमध्ये शिकवणारा आरोपी शिक्षक प्रेम कुमार गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींना जबरदस्तीनं आपल्या मांडीवर बसवून मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत होता. अल्पवयीन मुलींनी आरोपी शिक्षक करत असलेल्या अश्लील कृत्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती मिळताच विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचा आणि स्थानिक ग्रामस्थांचा संताप झाला.
बाराजमडा आजीविका महिला ग्राम संघटनेसह बाराजमडा येथील डझनभर महिलांनी आरोपी शिक्षकाला बेदम मारहाण केली. यानंतर विद्यार्थ्यांनी आरोपी शिक्षकाच्या तोंडाला काळं फासलं, चप्पलचा हार घालता आणि संपूर्ण परिसरात धिंड काढली. महिलांनी आरोपी शिक्षक प्रेम कुमारला बराजमडा ओपी पोलिसांच्या स्वाधीन करून कठोर कारवाईची मागणी केली.
मुलींना करायचा मारहाणशाळेत शिकणाऱ्या मुली जेव्हा शौचालयात जात असत तेव्हाही आरोपी शिक्षक बळजबरीनं मुलींच्या शौचालयात घुसायचा, विद्यार्थिनींनी विरोध केल्यावर आरोपी शिक्षक विद्यार्थिनींनाही मारहाण करत असे, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेची तक्रार विद्यार्थिनींनी घरच्यांकडे केली असता गावातील महिला प्रचंड संतप्त झाल्या आहेत.
आरोपी शिक्षकाची चौकशी सुरूशिक्षक प्रेमकुमार पोद्दारला कठोर शिक्षा व्हावी यासाठी संतप्त महिला आणि पीडित विद्यार्थिनींनी उपायुक्तांना पत्रही दिले आहे. सध्या आरोपी शिक्षक प्रेम कुमारची बाराजमडा पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असून, याच आरोपी शिक्षकाला तुरुंगात पाठवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी बाराजमडा पोलीस ठाण्यात घेराव घातला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"