जितेंद्र आव्हाड बंगल्यावरील मारहाण प्रकरण : सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 07:06 PM2020-04-23T19:06:40+5:302020-04-23T19:13:02+5:30
या मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करावे व या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.
मुंबई - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानेपोलिसांना दिले. पीडित अनंत करमुसे याने या मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करावे व या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.
या याचिकेवरील सुनावणी न्या. गिरीश कुलकर्णी यांच्यासमोर होती. आव्हाड, त्यांचे अज्ञात समर्थक व पोलिसांविरुद्ध अपहरण, मारहाणीप्रकरणी ८ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविला. एका फेसबुक पोस्टवरून आव्हाड यांच्या बंगल्यावर नेण्यात आले आणि तिथे त्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. करमुसे यांच्या म्हणण्यानुसार, ५ एप्रिल रोजी त्याच्या घरी पोलीस आले आणि त्याला पोलीस ठाण्यात जायचे, असे सांगण्यात आले. पण त्याऐवजी त्याला आव्हाड यांच्या बंगल्यात नेण्यात आले. तिथे त्यांना १० ते १५ माणसांनी मारले.
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड बंगल्यावरील मारहाण प्रकरण ‘त्या’ पोलिसांना भोवणार? निलंबनाची मागणी
Jitendra Awhad: आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणी पोलिसांची कारवाई; ५ जणांना अटक
Jitendra Awhad : अभियंता मारहाणप्रकरणी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना बेड्या
आव्हाड यांचे मॉर्फ फोटो फेसबुकवर टाकल्याप्रकरणी मारहाण करण्यात आली आणि हे घडत असताना स्वतः आव्हाड उपस्थित होते. मात्र, आव्हाड यांनी हे आरोप फेटाळले आहेत. न्या. कुलकर्णी यांनी पोलिसांना आव्हाड यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही ताब्यात घेऊन ते ठाणे दंडाधिकाऱ्यांपुढे बंद लिफाफ्यात सादर करण्याचे निर्देश दिले. यावर न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश देत या याचिकेवरील पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी ठेवली.