नवी दिल्ली - देशद्रोही विधान करणाऱ्या जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला कोर्टाने ५ दिवस दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेची कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
काल जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला पोलिसांनीअटक केली. शरजील इमामनं देशद्रोही विधान केल्यानं तो चर्चेत आला होता. त्यानं ईशान्य भारताला उर्वरित भारतापासून वेगळे करण्याची भाषा केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शरजीलच्या विरोधात देशद्रोह आणि धार्मिक तेढ वाढवण्यासह अनेक गंभीर आरोप करत अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल केलं गेलं होतं. त्याला मंगळवारी बिहारच्या जहानाबादमधून अटक करण्यात आली. तत्पूर्वी पोलिसांनी त्याचा भाऊ आणि मित्राला ताब्यात घेतलं होतं.शरजील हा बिहारच्या जहानाबादमधला रहिवासी आहे. त्याचे वडील अकबर इमाम जेडीयूचे नेते राहिले आहेत. अकबर इमाम यांनी जेडीयूच्या तिकिटावरून जहानाबादवरून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. शरजील कारण नसताना फसवलं गेल्याचा आरोप त्याच्या काकांनी केला आहे. शरजील इमामचा तपास क्राइम ब्राँचच्या पाच टीम करत होत्या. त्याच्याविरोधात सहा राज्यांत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.