शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

लिंग बदलून आयुष्मानचा बनली जोया; काच भोसकून केली हत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 8:19 PM

Murder Of Transgender : झोयाचा प्रियकर सआदतगंज येथील रहिवासी असलेल्या फैजानवर मदियानव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लखनौ: मुलगा-मुलगी बनलेल्या झोयाची मादियानव येथील घरात काचेने हत्या करण्यात आली. तिच्या कथित प्रियकरावर खुनाचा संशय घेण्यात आला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून हत्येत वापरलेल्या काचा आणि काही आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे. त्याला फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. झोयाचा प्रियकर सआदतगंज येथील रहिवासी असलेल्या फैजानवर मदियानव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोली बाहेरून कुलूपबंद पाहून अनुचित प्रकार घडण्याची भीतीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झोया गेल्या अडीच महिन्यांपासून कथित प्रियकर फैजानसोबत मादियानव येथील पलटन कॅन्टोन्मेंटमध्ये राहणारे नेमचंद्र यादव यांच्या घरी राहत होती. बुधवारी दुपारी तालकटोरा येथील राजाजीपुरम येथील रहिवासी असलेले झोयाचे वडील संजीव कुमार सिंग दोन दिवस फोन लागत नसल्याने मादियानव येथे पोहोचले. झोयाच्या खोलीला बाहेरून कुलूप लावलेले पाहून काही तरी अनुचित झाल्याच्या भीतीने त्यांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. हे पाहून मालकाने चावी बनवणाऱ्याला बोलावून कुलूप उघडले. खोलीत बेडवर झोयाचा रक्ताने माखलेला मृतदेह पडला होता. त्याचवेळी जवळच रक्ताने माखलेला काचेचा तुकडा पडला होता. मारेकऱ्याने झोयाचा डोक्याच्या मागच्या बाजूला वार करून तिची हत्या केली होती. आतील स्थिती पाहून वडिलांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करून तपास केला, त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.

पैशाच्या आमिषाने सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना अटक

शीना बोरा जिवंत आहे का? इंद्राणी मुखर्जीच्या दाव्यावर सीबीआय १४ दिवसांत करणार खुलासा

यात संशयास्पद साहित्य आणि दारूच्या बाटल्या सापडल्यातपासादरम्यान पोलिसांना खोलीतून रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह साहित्यही सापडले. बेडजवळ ठेवलेल्या दारूच्या रिकाम्या बाटलीचे झाकण उघडे आढळून आले. फैजान आणि झोया या प्रेमीयुगुलांनी आधी दारू प्यायली, त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रागाच्या भरात फैजानने तिची हत्या केली. झोयाच्या हाताची नस कापण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मृतदेहातून दुर्गंधी येत असल्याने सोमवारीच हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.खोली पती-पत्नी असल्याचं सांगून  घेतली होतीघरमालकाच्या म्हणण्यानुसार, केशवनगर येथील हॉटेलमध्ये जेवण जेवताना झोयाने मालकाकडून भाड्याने खोली घेण्याबाबत सांगितले होते. हॉटेल मालकाच्या सांगण्यावरून नेमचंद्रने झोयाला खोली भाड्याने दिली. घरमालकाच्या म्हणण्यानुसार, झोया आणि फैजान पती-पत्नी म्हणून त्याच्याकडे आले होते.दिल्लीत ऑपरेशन करून मुलाची मुलगी करण्यात आलेसंजीव सिंह यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा दोन वर्षांपूर्वीपर्यंत आयुष्मान सिंह या नावाने ओळखला जात होता. आयुष्मानने हायस्कूलपर्यंत इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतले आहे. तो सतत मोबाईलवर असायचा. आयुष्मान सिंहने दोन वर्षांपूर्वी मोबाईलवर व्हिडिओ पाहून मुलगी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. खूप समज देऊनही तो न पटल्याने संजीवने तालकटोरा पोलिसात जाऊन तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला मदत केली नसल्याचा आरोप आहे. यानंतर आयुष्मान दिल्लीला गेला, जिथे त्याने 70 हजार रुपये देऊन लिंग परिवर्तन केले आणि झोया बनला. झोया झाल्यानंतर त्याने कुटुंबातील सदस्यांशी संबंध तोडले होते.तपासात पोलिसांना झोया ट्रान्सजेंडर असल्याचे समोर आले. सत्य जाणून घेण्यासाठी किन्नरांच्या  दोन गटांशी बोलणे झाले. दोन्ही गटांनी झोयाला ओळखण्यास नकार दिला. एसीपी अलीगंज सय्यद अली अब्बास यांना सआदतगंज येथील घरावर टाकलेल्या छाप्यात फैजान सापडला नाही.  सर्विलांसच्या मदतीने त्याचे ठावठिकाणा कानपूरमध्ये असल्याचा सापडला आहे. त्याच्या अटकेनंतरच हत्येचे सत्य समोर येईल. एडीसीपी उत्तर प्राची सिंह यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून फैजानचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्लीTransgenderट्रान्सजेंडरDeathमृत्यू