नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एका आत्महत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या पत्नीचा मृतदेह दिल्लीतील भावाच्या घरी लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. साकेत न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे, कारण मृतदेहाजवळ तीन सुसाईड नोटही सापडल्या आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या पत्नीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार काल रात्री उशिरा साकेत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. तपासाअंती एका ४२ वर्षीय महिलेचा मृतदेह राजपूर खुर्द येथील भावाच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाजवळून 3 सुसाईड नोट जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.मीडिया रिपोर्ट्सनुसार, साकेत न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशाचे नाव अशोक बेनिवाल असून त्यांची पत्नी अनुपमा बेनीवाल यांनी तिच्या भावाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. 28 मे रोजी न्यायाधीश बेनिवाल यांनी पत्नी अनुपमा घरातून बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली आणि तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता शुक्रवारी रात्री उशिरा पत्नीचा मृतदेह भावाच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सध्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
भावाच्या घरी जाऊन न्यायाधीशाच्या पत्नीची आत्महत्या, मृतदेहाजवळ सापडल्या 3 सुसाईड नोट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 4:36 PM