बंगळुरु - देशातील विविध भागात मागासवर्गीय व्यक्तींवर होणाऱ्या अत्याचारांचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. दरम्यान, आता कर्नाटकमध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडली असून, केवळ वरच्या जातीमधील व्यक्तीच्या दुचालीला हात लावला म्हणून एका व्यक्तीला विवस्त्र करून त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूपासून ५३० किमी दूर असलेल्या विजयपुरा येथे ही घटना घडली आहे. मारहाण झाल्यानंतर पीडित व्यक्ती पोलीस ठाण्यात आली. तिथे त्याने आपल्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी १३ लोकांविरोधात एससी एसटी अॅक्ट आणि भादंवि कलम, १४३, १४७, ३२४, ३५४, ५०४, ५०६, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही आरोपींची चौकशी सुरू आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी अनुपम अग्रवाल यांनी याबाबत सांगितले की, तालीकोट येथे काल मिनाजी गावातील एका मागासवर्गीय व्यक्तीला क्रूरपणे मारहाण करण्यात आल्याचे वृत्त आले होते. संबंधित व्यक्तीने एका वरच्या जातीमधील व्यक्तीच्या दुचाकीला हात लावला. त्याचे निमित्त करून १३ जणांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या मारहाणीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये संतप्त जमाव पीडित व्यक्तीला मारहाण करण्यात गुंतलेले दिसत आहेत. तसेच सध्या कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंगसारखे नियम लागू असताना सर्व आरोपी एकमेकांजवळ उभे असल्याचे जवळ आहे. गेल्या काही दिवसांत कर्नाटकमधील कोरोनाचा फैलाव वेगाने वाढला असून, सध्या कर्नाटक हे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी
गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…