लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वडाळ्यातील महापालिकेच्या एका शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांकडून वर्गमैत्रिणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने सर्वांनाच सुन्न केले. एनसीआरबीच्या २०२१ च्या अहवालातील आकडेवारी पाहता देशातील बालगुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत आहे. हलाखीची कौटुंबिक स्थिती, पालकांचे दुर्लक्ष, वाईट संगत आणि जडलेली व्यसने, त्यात नेटवर्किंगबरोबर पॉर्नचे वाढते जाळे यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या वाटेकडे वळताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक बालगुन्हेगार हे पालकांसोबतच राहतात.
मुंबई चौथ्या क्रमांकावर n गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, बालगुन्हेगारीत दिल्ली (२,६१८), चेन्नई (४९६), अहमदाबाद (३८६) पाठोपाठ मुंबईचा (३३२) चौथा क्रमांक लागतो. n २०२० मध्ये मुंबईत ३३२ गुह्यांची नोंद झाली. २०१९ (६११) आणि २०१८ (८६३) च्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. या गुन्हेगारीत १६ ते १८ वयोगटातील बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
हलाखीची कौटुंबिक स्थिती, पालकांचे दुर्लक्ष आणि जडलेली व्यसने, त्यात नेटवर्किंगबरोबर पॉर्नचे वाढते जाळे यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या वाटेकडे वळताना दिसत आहेत.