शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

‘कल्याण- मुंबई’ला आले जिंतुरात सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 7:02 PM

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

ठळक मुद्दे ठिकठिकाणी खुलेआम जुगार

जिंतूर : सहा महिन्यांपूर्वी बंद असणारा जुगार आता मात्र खुलेआमपण जिंतूर शहरासह तालुक्याच्या विविध ठिकाणी सुरु असून पोलीस प्रशासन याकडे मात्र कानाडोळा करीत आहे. 

शहरासह ग्रामीण भागात जिंतूर येथे नव्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त आल्यापासून जुगार व अवैध धंदे बंद होते. गणेशोत्सव बंदोबस्त व विधानसभा निवडणूक संपल्यानंतर या अवैध धंद्येवाल्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जिंतूर शहरात ७ ते ८ मुख्य बुकी असून इतर अनेक एजंट शहराच्या विविध भागात आहेत. शहरातील मोंढा परिसर, जिल्हा परिषद शाळेचे मैदान, बसस्थानक, शिवाजी चौक या भागामध्ये कल्याण- मुंबई या नावाच्या जुगाराचे अनेक एजंट पहावयास मिळतात. विशेष म्हणजे, गुपचूपपणे सुरु असताना व मोबाईलद्वारे छुप्या मार्गाने सुरु असणारा हा जुगार मागील दोन महिन्यांपासून चिठ्ठ्या देऊन बिनबोभाटपणे सुरु आहे. मुंबई- कल्याण या मटक्याबरोबरच शहरामध्ये काही ठिकाणी पत्याचे क्लबही राजरोसपणे सुरु आहेत. याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष दिसत आहे.  

तालुक्यामध्ये ग्रामीण भागात येलदरी, इटोली, चारठाणा येथेही मोठ्या प्रमाणावर कल्याण- मुंबई मटका घेतला जातो. बोरी परिसरातही अनेक भागामध्ये मटका राजरोसपणे सुरु आहे. एकीकडे पोलीस प्रशासन अवैध धंदे बंद असल्याचे सांगत असले तरी प्रशासनातील काही कर्मचाºयांशी हातमिळवणी करुन हा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरु आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांचे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसते. ग्रामीण भागात कल्याण- मुंबई जुगाराबरोबरच पत्याचे क्लबही राजरोसपणे सुरु आहे. आसेगाव, दुधगाव, वस्सा, कौसडी, चारठाणा, येलदरी या भागात अनेक पत्याचे क्लब चालतात. याकडेही त्या त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. येलदरीमध्ये तर खुलेआमपणे मटका, क्लब व अवैध दारु विक्री जोरात सुरु आहे. 

ऑनलाईन लॉटरीचा : व्यवसायही तेजीतमुंबई, कल्याण जुगाराप्रमाणेच ताबडतोब निकाल लागत असल्याने आॅनलाईन लॉटरीही मोठ्या प्रमाणावर जिंतूर  तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे. या लॉटरी व्यावसायिकांना कोणतीही परवानगी नाही. हा जुगाराचाच एक प्रकार असून स्थानिक कर्मचाºयांना हाताशी धरुन हा अवैध ऑनलाईन मटका बिनबोभाटपणे सुरु आहे. 

अवैध दारु विक्रीकडे दुर्लक्षजिंतूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागात सर्रास अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक, पानपट्टी व दुकानात सर्रासपणे देशी व विदेशी दारु मिळते. याकडे पोलीस प्रशासनाचे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. 

जिंतूर तालुक्यामध्ये अवैध धंदे सुरु असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर फंटरवर कारवाई करण्याऐवजी मुख्य बुकी चालकांच्या मुसक्या आवळू व अवैध धंदे कायमचे बंद करण्यासाठी प्रयत्न करु.- श्रवण दत्त, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिंतूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसparabhaniपरभणी