शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘त्या’ तरुणीची आत्महत्या की घातपात? इमारतीच्या गच्चीवर मित्र, मैत्रिणी हजर असल्याने संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 11:25 AM

घटनेच्यावेळी तिची मैत्रीण काजल जैस्वाल घटनास्थळी हजर होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.

कल्याण :

पूर्वेत राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने रविवारी रात्री राहत्या बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची नोंद कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केलेली असली, तरी या घटनेच्यावेळी तिची मैत्रीण काजल जैस्वाल घटनास्थळी हजर होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. त्या तरुणीचे काही मित्रही हजर होते, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली गेल्याने त्या तरुणीने आत्महत्या केली की, हा घातपाताचा प्रकार आहे, अशी चर्चा सुरू झाली.

घटना घडण्याच्या एक तास आधी रात्री ९.२८ ला तिने मोबाइल नोटपॅडमध्ये तिला होत असलेल्या त्रासाबद्दल नमूद केले होते. त्यानंतर तिची मैत्रीण व मित्र तिला भेटायला आले व गच्चीवरून उडी मारून तिने जीव दिला की, तिला तसे करण्यास भाग पाडले गेले, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.तरुणीचे एका मुलावर प्रेम होते. शरीरसंबंधाच्या वेळी त्याने काढलेला व्हिडीओ मित्रांना दाखविला. मित्रांनी  तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. गेले दीड वर्षे हा अत्याचार सुरू होता. अखेर, या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. 

नोटपॅडवरील लिखाण ठरणार महत्त्वाचा पुरावातरुणीने २४ मे च्या रात्री दीडच्या सुमारास तिच्या मोबाइलच्या नोटपॅडमध्ये तिच्याबाबतीत घडलेला सर्व प्रकार नमूद केला. आत्महत्येच्या दिवशी १२ जूनला रात्री ९.२८ वाजता तिने तिच्या मोबाइलच्या नोटपॅडमध्ये शेवटचा मजकूर लिहिला. त्यानंतर एक तासाने १०.३० वाजता आत्महत्येची घटना घडली. नोटपॅडमध्ये काय लिहिले आहे, हा तपासाचा भाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तरुणी मृत झाल्याने तिचा जबाब पोलिसांना घेता येणार नाही. 

परिचितांनीच केला घात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मानपाडा हद्दीत गतवर्षी २३ सप्टेंबरला घडली होती. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन नऊ महिन्यांत डोंबिवलीसह विविध ठिकाणी पीडितेवर बलात्कार झाला होता. याच घटनेची पुनरावृत्ती कल्याणमध्ये घडली असून यात मात्र पीडित तरुणीला जीव गमवावा लागला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण