मुंबई: "Didda द वॉरीयर क्वीन ऑफ काश्मीर" या पुस्तकातील काही भाग कंगना राणावत हिने तिच्या नवीन चित्रपटाच्या घोषणेचे ट्विटर करताना वापरला. त्यासाठी त्यांनी माझ्याकडून कोणतीही परवानगी घेतली नाही असा आरोप पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी करत याबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार शुक्रवारी खार पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.कौल यांनी वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार त्यांच्या पुस्तकातील स्टोरीचा आशय असलेला ईमेल त्यांनी कंगनाला पाठवला होता. सदर ईमेलमधील कहाणीचा काही भाग कंगनाने तिच्या दुसऱ्या सिनेमाची घोषणा करताना मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय ट्वीटमध्ये वापरला. त्यामुळे तिने त्यांचा विश्वासघात करत फसवणूक केली असे त्यांनी तक्रारीत नमुद केले होते. या तक्रारीवरून न्यायालयाने शुक्रवारी सीआरपीसी १५६(३) अन्वये कंगनासह तिची बहीण रंगोली चांडेल, भाऊ अक्षत राणावत आणि कमलकुमार जैन यांच्या विरोधात विश्वासघात ,फसवणूक व कॉपीराइटचे उल्लंघन इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कंगना, रंगोलीविरोधात गुन्हा दाखल; Didda द वॉरीयर क्वीन ऑफ काश्मीर" पुस्तकाच्या लेखकाने दिला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 9:51 PM
Kangana ranaut and Didda The Warrior Queen of Kashmir : परवानगी शिवाय पुस्तकातील स्टोरीच्या आशयाचा ट्विटमध्ये वापर
ठळक मुद्देकौल यांनी वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.त्यांनी माझ्याकडून कोणतीही परवानगी घेतली नाही असा आरोप पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी करत याबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली होती.