शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Kangana Ranaut: कंगनाच्या बॉडीगार्डला अटक; लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, फसवणुकीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 16:13 IST

Kangana Ranaut's bodyguard Kumar Hegde: पोलीस अधिकाऱ्यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, मुंबई पोलिसांच्या एका टीमने शनिवारी कुमार हेगडेला मंड्याच्या हेगडाहळ्ळी येथून अटक केली आहे. त्याने पीडित महिलेशी संपर्क तोडला होता.

बॉलीवूडची (Bollywood) वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) बॉडीगार्डला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. कंगनाचा बॉडीगार्ड कुमार हेगडेवर (Bodygaurd Kumar Hegde) वर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. एका मेक अप आर्टिस्टने हे आरोप केले आहेत. हेगडेला त्याच्या गावातून अटक करण्यात आली आहे. (Kangana Ranaut's bodyguard arrested in Mandya over allegation of rape)

पोलीस अधिकाऱ्यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, मुंबई पोलिसांच्या एका टीमने शनिवारी कुमार हेगडेला मंड्याच्या हेगडाहळ्ळी येथून अटक केली आहे. त्याने पीडित महिलेशी संपर्क तोडला होता. यामुळे त्या महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याने तिच्याकडून 50000 रुपये घेतले परंतू परत केले नसल्याचा आरोपही तिने केला आहे. 

या ३० वर्षांच्या ब्यूटीशियनने कंगनाच्या बॉडीगार्डंवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. गेल्या वर्षी जूनमध्ये ती एका सिनेमाच्या शुटिंगवेळी कुमार हेगडेला भेटली होती. तिच्या तक्रारीनुसार कुमार हेगडेने तिला लग्नासाठी विचारणा केली होती. यानंतर तिला त्याच्यासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सांगितले. तो तिच्याशी लग्न करणार असल्याने ती यास तयार झाली. एकत्र राहत असताना तिने हेगडेला शरिरसंबंध ठेवण्यास नकार दिला, परंतू त्याने तिला ते करण्यास बळी पाडले. तसेच त्याने काही दिवसांपूर्वी आईची तब्येत खराब असल्याचे सांगून तिच्याकडून 50000 रुपये घेतले आणि तेव्हापासून तो तिच्या संपर्कात नव्हता. यापूर्वी, कंगना रानौतचा आधीचा हेअर स्टाइलिस्ट ब्रेंडन एलीस्टर डी जीवर 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतMumbai policeमुंबई पोलीसKarnatakकर्नाटकbollywoodबॉलिवूड