Udaipur Kanhaiya Lal Murder : राजस्थानमधील उदयपूरमध्ये हत्या झालेल्या टेलर कन्हैया लालच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठे खुलासे झाले आहेत. कन्हैया लालची मान धारदार शस्त्राने छाटण्यात आली. शरीरावर 26 वार करण्यात आले असून 13 ठिकाणी कापल्याच्या खुणाही आढळून आल्या आहेत. मंगळवारी दुपारी कपडे मोजण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद यांनी टेलर कन्हैयालालची निर्घृण हत्या केली.
कन्हैया लालच्या शरीरावर 2 डझनहून अधिक जखमा कन्हैया लालच्या प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अनेक मोठे खुलासे झाले असून शरीरावर दोन डझनहून अधिक जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार कन्हैया लालच्या मानेवर सात ते आठ वार करण्यात आले होते.कन्हैया लालचा एक हात कापलापोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कन्हैया लालचा एक हातही कापल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, कन्हैया लालच्या मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे एकाच वेळी जास्त रक्तस्त्राव आणि अनेक नसा कापणे आहे.
8 वर्षाच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ केली पोस्ट, दिवसाढवळ्या वडिलांची हत्याराष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या निर्घृण हत्येचा तपास हाती घेतला आहे आणि युएपीए कायदा तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे, असे एजन्सीने म्हटले आहे.
टेलरचा गळा चिरणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक, गोंधळानंतर इंटरनेट बंद