शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

५ लग्न, ३२ मुलींसोबत चॅटिंग अन् भावाच्या पत्नीवर बलात्कार; भोंदूबाबाचा कारनामा 'असा' झाला उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 12:31 PM

किदवई नगर पोलिसांनी पकडलेला बाबा शाहजहांपूर येथील रहिवासी अनुज चेतन कठेरिया आहे.

ठळक मुद्दे५ व्या पत्नीनं मागच्या वर्षी चकेरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती.११ मे रोजी अनुजवर कलम ३७७, ३२३, ३०७ या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बाबा अनुज शाहजहांपूर येथे बंजारा बाबा कल्याण सेवा ट्रस्टच्या नावाखाली तंत्रमंत्राचा अड्डा चालवत होता.

कानपूर – हिंदी सिनेमा किस किस को प्यार करू याची कहानी तुम्हाला आठवत असेल. सिनेमातील हिरो कोणत्या ना कोणत्या मजबुरीत येऊन ४ लग्न करतो. रिल लाईफमधील ही कहानी रिअल लाईफमध्येही समोर आली आहे. कानपूरच्या किदवई नगर पोलिसांनी एका बाबाला अटक केली आहे. तो या सिनेमाच्याही दोन पाऊलं पुढे गेलेला आहे. हे प्रकरण ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

किदवई नगर पोलिसांनी पकडलेला बाबा शाहजहांपूर येथील रहिवासी अनुज चेतन कठेरिया आहे. ज्याने आतापर्यंत तब्बल ५ लग्न केली आहेत. इतकचं नाही तर ५ बायकांना लपवून आता तो सहावं लग्न करण्याच्या तयारीत होता. अनुजनं त्याचे ४ लग्न सगळ्यांसमोर लपवून श्यामनगर येथे राहणाऱ्या एका महिलेसोबत पाचवं लग्न केले होते. मात्र याच पत्नीने पोलिसांसमोर बाबा अनुजचा भांडाफोड केला. नाव आणि ओळख बदलून अनुज महिलांसोबत लग्न करत होता.

लग्नाच्या काही दिवसांनंतर त्याने पत्नीचा छळ करण्यास सुरूवात केली. याबाबत ५ व्या पत्नीनं मागच्या वर्षी चकेरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. अनुज किदवई परिसरात राहत असल्याने पुन्हा या पत्नीने किदवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. ११ मे रोजी अनुजवर कलम ३७७, ३२३, ३०७ या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस तपासात बाबाची कुंडली बाहेर निघाली

पोलिसांनी जेव्हा बाबाचा तपास करण्यास सुरुवात केली तेव्हा बाबा अनुज शाहजहांपूर येथे बंजारा बाबा कल्याण सेवा ट्रस्टच्या नावाखाली तंत्रमंत्राचा अड्डा चालवत होता. याठिकाणी समस्येने त्रस्त असलेल्या महिला बाबाकडे मदत मागायला यायच्या तेव्हा तो या महिलांना, युवतींना त्यांच्या जाळ्यात अडकवायचा.

शादी डॉट कॉमवर प्रोफाईल

अनुज कठेरिया याने शादी डॉट कॉमवर त्याचा प्रोफाईल बनवून ठेवला आहे. त्यात त्याने स्वत:चं नाव लकी पांडेय असं लिहिलं आहे. पोलिसांच्या चौकशीत अनुज तब्बल ३२ मुलींशी चॅटिंग करत होता. त्याचा रेकॉर्डही मिळाला आहे. काही मुलींना अनुज टीचर असल्याचं सांगत होता तर काहींना हॉटेलचा मालक असल्याची बतावणी करत होता. ८ वी शिक्षण असलेला अनुज स्वत:ला बीएससी पास असल्याचं दाखवत इंग्रजीत चॅटिंग करत होता.

२००५ मध्ये पहिलं लग्न

अनुजनं २००५ मध्ये जनपद मैनपुरी येथे राहणाऱ्या युवतीसोबत लग्न केले होते. दुसरं लग्न बरेलीच्या युवतीसोबत २०१० मध्ये केले होते. तिसरं लग्न २०१४ मध्ये औरेया येथे राहणाऱ्या युवतीसोबत केले होते. त्यानंतर तिला सोडलं. चौथं लग्न त्याने तिसऱ्या पत्नीच्या बहिणीशी केले. जेव्हा अनुजचं सत्य तिला कळालं तेव्हा तिने आत्महत्या केली. पाचवं लग्न कानपूरच्या श्यामनगरमध्ये राहणाऱ्या युवतीसोबत २०१९ मध्ये केले होते.

छोट्या भावाच्या पत्नीलाही सोडलं नाही

अनुजने त्याच्या छोट्या भावालाही सोडलं नाही. छोट्या भावाच्या पत्नीने अनुजविरोधात २०१६ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यात अनुजला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

टॅग्स :Policeपोलिस