कानपूर - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्येही अशीच एक घटना घडली आहे. पाळीव कुत्र्याला ठार मारल्याने दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याने यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
वादाचं रुपांतर हाणामारीत
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या रसुलाबाद भागातील नौहा गावात एका गटाने दुसर्या गटावर कुत्र्याला ठार मारल्याचा आरोप केला. या दोन गटामध्ये जोरदार वाद झाला. पुढे हा वाद विकोपाला गेला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. रघुनंदन सिंह यांचा पाळीव कुत्रा हा गावातील शमसुद्दीन यांच्या घराजवळ मृतावस्थेत आढळला. त्यानंतर रघुनंदन यांनी शमसुद्दीन यांच्यावर कुत्र्याला ठार मारल्याचा आरोप केला. याच दरम्यान दोन गटात वाद झाला त्यामध्ये सात हून अधिक जण जखमी झाले आहेत.
गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
क्रूरतेचा कळस! वृद्ध काकाला भाच्याने जनावरांसोबत साखळीने बांधलं, अशी झाली अवस्था
भाच्याने आपल्या वृद्ध काकाला जनावरांसोबत साखळीने बांधल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील घियाला गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 65 वर्षांच्या काकांना भाच्याने जनावरांसोबत गोठ्यात साखळीन बांधून ठेवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध व्यक्तीच्या शरीरावर मारहाण केल्याच्या काही खुणाही पाहायला मिळाल्या आहेत. मानवाधिकार आयोगाने वृद्धाला मदत केली आहे. गावाचे सरपंच प्रवीण कुमार यांनी स्थानिकांच्या मदतीने या वृद्धाची सुटका केल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मनसे आणि शिवसेना संघर्ष पुन्हा पेटणार; ठाणेकरांना दिलेली आश्वासन पूर्ण करा अन्यथा...
"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला
Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल