Crime News : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये एका मुलीने 2 वर्षाआधी एका तरूणावर छेडछाड केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तुरूंगातून बाहेर आल्यावर त्याने मुलीसोबत गैरवर्तन केलं आणि केस मागे घेण्यासाठी धमकी दिली. असं केलं नाही तर शीर धडापासून वेगळं करण्याचीही त्याने धमकी दिली. भितीमुळे मुलीने शाळाही सोडली. इतकंच नाही तर मुलीच्या वडिलांनी आपलं विकून परिसरही सोडला.
ही घटना महानगर भागातील आहे. आरोप आहे की, इथे एक मुलगा एका मुलीच्या मागे 2 वर्षांपासून होता. मुलगी आधी रेल बाजार भागात आपल्या वडिलांसोबत राहत होती. इथे राहणारा अनस तिची छेडछाड करत होता. तो तिच्यावर जबरदस्ती निकाह करण्याचा दबाव टाकत होता. पण मुलगी हिंदू होती.
घटना 2 वर्षाआधीची आहे. जेव्हा त्याने मुलीसोबत क्लासमध्ये छेडछाड करत रेप करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर तिच्या वडिलांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. यावर कारवाई करत त्याला तुरूंगातही डांबण्यात आलं होतं. पण तुरूंगातून बाहेर येताच तो थेट मुलीच्या क्लासमध्ये पोहोचला आणि त्याने तिच्यासोबत छेडछाड केली. मुलीने आरडाओरड केली तेव्हा त्याने तिला धमकी दिली.
पीडितेने सांगितलं की, 'हा मुलगा 2 वर्षापासून तिच्या मागे लागला आहे. त्याच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर तो तुरूंगात गेला होता. बाहेर आल्यावर तो 2 तारखेला तिच्या क्लासमध्ये आला होता आणि माझ्यासोबत छेडछाड केली. यावेळी त्याने धमकी दिली की, केस मागे घे नाही तर चेहरा अॅसिडने जाळीन. शीर धडापासून वेगळं करेन. त्यासोबत तो निकाह करण्यासाठी जबरदस्ती करत होता. त्यामुळे मी शाळेत जाणं सोडलं'.
पीडिता म्हणाली की, जेव्हा ती नौबस्ता पोलीस स्टेशनमध्ये गेली तेव्हा पोलीस अधिकारी म्हणाला की, तुझ्या सांगण्यावरून एफआयआर नोंदवू शकत नाही. चौकशी केल्यावर रिपोर्ट लिहिणार. त्यांनी 6 जानेवारीला माझी तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांनी त्याला अजून पकडलं नाही. शाळेच्या सीसीटीव्हीमध्येही आरोपीचा चेहरा दिसत आहे. पोलिसांनी सांगितलं की, याबाबत चौकशीनंतर कारवाई केली जाईल.