शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 3:32 PM

जिम ट्रेनर विमल सोनी याचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्याच्याकडे अनेक लोक ट्रेनिंगसाठी यायचे.

कानपूरमध्ये एका व्यावसायिकाच्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जिम ट्रेनरने एकता नावाच्या महिलेची हत्या केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आलं की, जिम ट्रेनर विमल सोनी याचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्याच्याकडे अनेक लोक ट्रेनिंगसाठी यायचे. मात्र चार महिन्यांपूर्वी एकता गुप्ता हिची हत्या केल्यानंतर त्याने सर्व सोशल मीडिया अकाउंट बंद केले.

जिम ट्रेनिंग दरम्यान ट्रेनर विमल सोनीने विवाहित असलेल्या एकताला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. पण पुढे परिस्थिती अशी आली की, विमलने एकताची हत्या केली आणि डीएम बंगल्याजवळ खड्डा खणून तिचा मृतदेह पुरला. मात्र चार महिन्यांनी आता तो पकडला गेला. यावेळी एकताचा सांगाडा सापडला. 

अटक केलेल्या जिम ट्रेनर विमलने सांगितलं की, एकता स्वतः माझ्याकडे आली होती. ती स्वतः माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही लग्न करू देत नव्हती. याच वादामुळे तिला आपल्या मार्गातून हटवलं. २४ जून रोजी ग्रीन पार्क स्टेडियमच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये विमल सोनीने एकता गुप्ताची हत्या केल्याची माहिती आहे. त्यानंतर मृतदेह एका खड्ड्यात पुरला. 

चार महिने विमल येथून फरार होता. कानपूरचे डीसीपी एसके सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकताची हत्या करून फरार झालेला विमल सोनी पंजाबमधील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. त्यानंतर काही काळ तो इकडे तिकडे भटकत राहिला. तो मोबाईलचा वापर करत नव्हता. अखेर त्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी