कानपूर:उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्याचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी केलेल्या एका गोष्टीमुळे सध्या त्यांचीच सर्वत्र चर्चा होत आहे. घटना जाजमऊतील केडीए कॉलोनीची आहे. येथील एका मुलगा आपल्या वृद्ध आई-वडिलांना मागील अनेक वर्षांपासून मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी मारहाण करत त्यांना घराबाहेर काढले.
यानंतर या वृद्ध दांपत्याने चकेरी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या मुलगा आणि सुनेविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. पण, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. यानंतर हे प्रकरण पोलिस आयुक्तांच्या कानावर गेले. त्यानंतर आयुक्त असीम अरुण पीडित वृद्ध दांपत्य अनिल कुमार शर्मा आणि कृष्णा शर्मा यांच्यासोबत त्यांच्या घरी गेले आणि मुलांना समजून सांगितलं. पण, मुलगा आणि सून ऐकायला तयार नव्हते.
यानंतर आयुक्तांनी मुलगा आणि सूनेला अटक केली, तर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. तसेच, त्या वृद्ध दांपत्याच्या सुरक्षेसाठी दोन कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय त्यांनी आदेश काढून यापूढे अशा घटना घडल्यास तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. आयुक्तांच्या या कारवाईनंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.